Nashik Lok Sabha Election 2024 esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : निकाल लोकसभेचा, मात्र धाकधूक वाढली आमदारांची

Lok Sabha Election : लोकसभेच्या निवडणुकीत प्रामुख्याने विधानसभा मतदारसंघनिहाय कुणाला किती आघाडी मिळाली, यावर त्या भागातील विद्यमान आमदारांचा प्रभाव निश्चित होतो.

मोठाभाऊ पगार

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या निवडणुकीत प्रामुख्याने विधानसभा मतदारसंघनिहाय कुणाला किती आघाडी मिळाली, यावर त्या भागातील विद्यमान आमदारांचा प्रभाव निश्चित होतो. युती वा आघाडीच्या संबंधित उमेदवारास किती मते मिळवून दिली, याचेही परीक्षण या निकालावेळी होणार आहे. त्यामुळे निकाल लोकसभेचा असला तरी विद्यमान आमदार आणि काही प्रबळ इच्छुकांची आतापासूनच धाकधूक वाढली आहे. ( MLA fear increases due to result of lok sabha election on 4 june )

आपल्या मतदारसंघातून दिलेल्या मताधिक्यावर त्यांची विधानसभेची उमेदवारी ठरणार असते, त्यामुळे उमेदवाराबरोबरच आमदार आणि इच्छुकांमध्ये वेगळीच भीती पाहायला मिळत आहे. दिंडोरी लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत आमदारांची पण परीक्षा होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मताधिक्य देण्यात आमदार कमी पडल्यास विधानसभेवेळी त्याचा विचार केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.

काहींच्या मते लोकसभा निवडणुकीतील मुद्दे व विधानसभा निवडणुकीतील गणिते वेगळी असू शकतात. त्यामुळे थेट असा निकष लावणे घाईघाईचे ठरेल. मात्र असे असले तरी या निवडणुकीतील मतांच्या संख्येवर पुढील गणिते मांडली जाणार, हे मात्र नक्की! दिंडोरी मतदारसंघात कळवण- सुरगाणा, येवला, निफाड, दिंडोरी- पेठ या चार विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटांचे आमदार आहेत. (latest political news)

तर नांदगाव गटात शिवसेना शिंदे गटांचे आमदार व चांदवड- देवळा मतदारसंघात एकमेव भाजपचे आमदार आहेत. सुहास कांदे, नितीन पवार, डॉ. राहुल आहेर, छगन भुजबळ, दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ हे सर्व सत्ताधारी आमदार असून, महायुतीचे घटक आहेत आणि डॉ. भारती पवार या महायुतीच्या उमेदवार असून, त्यांना निवडून आणण्यासाठी या आमदारांनी केलेले प्रयत्न मताधिक्यात परिवर्तित होणार की नाही, याकडेही लक्ष लागून आहे. त्यामुळे हा लोकसभेचा निकाल आमदारांसाठीही चिंतेचा विषय असणार आहे.

दिंडोरी लोकसभेतील विधानसभानिहाय मतदान

नांदगाव : ३,३२,५१२ १,९३,६५७ (५८.२४ टक्के)

कळवण-सुरगाणा : २,९४,००० २,०८,४२० (७०.८९ टक्के)

चांदवड-देवळा : २,९९,३०४ १,९९,४९७ (६६.६५ टक्के)

येवला : ३,१४,५५१ २,०५,६६९ (६०.१३ टक्के)

निफाड : २,९१,४५९ १,८७,४२५ (६४.३१ टक्के)

दिंडोरी-पेठ : ३,२१,५५८ २,४२,५१२ (७५.४२ टक्के)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT