NMC
NMC esakal
नाशिक

Water Reduction Model : पाणी कपातीचे ‘नाशिक मॉडेल’ राज्यभरात; एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रशांत महासागरामध्ये ‘अल निनो’ वादळाचा परिणाम मॉन्सून लांबणीवर होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर राज्यात महापालिकांमध्ये पाणी जपून वापरण्यासाठी कपात अटळ आहे.

त्या संदर्भात नाशिक महापालिकेने पाणी कपातीचे केलेले नियोजन राज्यभर चर्चेत आले असून, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी महापालिकेच्या मॉडेलचे कौतुक करताना राज्यभर हे मॉडेल अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Nashik Model of water reduction across state Implementation in first week of April news)

दक्षिण प्रशांत महासागरामध्ये जून महिन्यात अल निनो चक्रीवादळाची निर्मिती होईल. त्याचा परिणाम आशिया खंडात दिसून येणार आहे. जून महिन्यात नैऋत्य मौसमी वाऱ्याचा प्रवास वेगाने सुरू होतो. त्या प्रवासामध्ये अडथळे निर्माण होऊन पावसाळा लांबणीवर पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

त्यामुळे राज्य शासन अलर्ट मोडमध्ये आले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक शहरीकरण झाल्याने महापालिका व नगरपालिकांना ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एरवीही ३१ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन असते. मात्र यंदा महिनाभर नियोजन करावे लागणार आहे.

त्यासाठी प्रत्येक महापालिकेकडून राज्याच्या प्रधान सचिवाकडून कृती आराखडा मागविण्यात आला. आतापर्यंत नऊ महापालिकांनी आराखडा सादर केला. त्यात नाशिक महापालिकेचा पाणी कपातीचा आराखडा कौतुकास्पद ठरला आहे.

या संदर्भात प्रधान सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी महापालिकेच्या आराखड्याचे मुंबईत झालेल्या बैठकीत कौतुक केले. नाशिक महापालिकेच्या पाणी कपातीचे मॉडेल राज्यभर अमलात आणले जाणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

एक दिवस संपूर्ण पाणीपुरवठा बंद

एप्रिल महिन्यापासून पाणी कपात करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी बैठक घेतली जाईल. त्यात परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन केले जाणार आहे. निर्णय झाल्यास एप्रिल महिन्यात आठ दिवसातून एक दिवस संपूर्ण पाणीपुरवठा बंद केला जाईल.

मे महिन्यात आढावा घेऊन आठ दिवसातून दोनदा, तर त्यानंतर टप्प्याटप्प्याने कपात वाढविली जाणार आहे. पाणीकपात करण्यासाठी महापालिकेकडून पाणी कपातीसाठी जनजागृती केली जाणार आहे.

महापालिकेच्या ३१ विहीरी स्वच्छ करून आवश्‍यकता भासल्यास पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी पाण्याचा वापर केला जाणार आहे. टंचाई वाढल्यास १६० खासगी विहीरी अधिग्रहीत करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या एक हजार १८९ विंधन विहिरींची दुरुस्ती केली जाईल. २० ते २५ टक्के पाणी कपातीचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT