Modi Ration Bag
Modi Ration Bag esakal
नाशिक

Modi Ration Bag : जिल्ह्यातील 8 लाख 31 हजार कुटुंबीयांना ‘मोदी पिशवी’

सकाळ वृत्तसेवा

Modi Ration Bag : महिलांना मोफत साडी मिळाल्यानंतर आता स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेली कापडी पिशवी देण्यात येत आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत धान्य घेणाऱ्या आठ लाख ३१ हजार कुटुंबीयांना ही पिशवी मिळणार आहे. पिशवीचा आकार छोटा असल्यामुळे केवळ पाच किलो धान्य बसत असल्याची तक्रारही काही लाभार्थ्यांनी पुरवठा विभागाकडे केली. ()

जिल्हा पुरवठा विभागामार्फत महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आता रेशनचे धान्य घेणाऱ्या कुटुंबीयांना ज्यूटपासून तयार करण्यात आलेली कापडी पिशवी मोफत देण्यात येत आहे. जिल्ह्यात एक लाख ६६ हजार २०८ व्यक्ती अंत्योदय योजनेचा लाभ घेतात. प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत सहा लाख २२ हजार १३२ कुटुंबीय रेशन दुकानातून धान्य घेतात.

रेशन दुकानातून मिळणारे धान्य घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनाही पिशवी हवी असते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असल्यामुळे गावागावांत या पिशवीची चर्चा सुरू आहे. जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या आठ लाख ३१ हजार पिशव्यांपैकी सात लाख ८५ हजार ३७१ (९४.५१ टक्के) पिशव्या गुदामातून जिल्ह्यातील दोन हजार ६०८ स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोचल्या आहेत. (latest marathi news)

ई-पॉस मशिनवर लाभार्थ्यांचा अंगठा घेऊन एक लाख १२ हजार ९४१ पिशव्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. आचारसंहितेपूर्वी सर्व पिशव्यांचे वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार नियोजन केले जात आहे. दरम्यान, पिशवीची क्षमता कमी असल्यामुळे धान्य बसत नसल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली. त्यामुळे एका लाभार्थ्याला दोन पिशव्या देण्याची मागणी होऊ लागली आहे.

''स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत पिशव्यांचे वाटप सुरू आहे. आचारसंहितेपूर्वी सर्व पिशव्यांचे वाटप होईल, यादृष्टीने आम्ही नियोजन केले आहे.''-कैलास पवार, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी (नाशिक)

तालुकानिहाय कापडी पिशव्या

बागलाण- ६१,१५१

चांदवड- ३६७८१

देवळा- २५५८२

दिंडोरी- ५१२७७

मालेगाव शहर- ५६०२१

नाशिक शहर- १०३०८०

इगतपुरी- ३३०१३

कळवण- ३८१८७

मालेगाव- ६६०७८

नांदगाव- ४२६६०

नाशिक- ६९८२८

निफाड- ७६७७०

पेठ- २४७६७

सिन्नर- ५०४६६

सुरगाणा- ३१६६३

त्र्यंबकेश्‍वर- २३२६३

येवला- ४०४१४

एकूण- आठ लाख ३१ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT