Sowing rice esakal
नाशिक

Nashik Monsoon Dealey : पेठमध्ये भात पेरणी फक्त 2 टक्के! हाताला काम नसल्याने शेतमजूर अर्धपोटी

Nashik News : तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने ओढ दिल्याने आजपर्यंत भात लागवड केवल २ टक्के झाली असून भुईमूग पेरा १८ टक्के झाला आहे.

रखमाजी सुपारे

Nashik News : तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने ओढ दिल्याने आजपर्यंत भात लागवड केवल २ टक्के झाली असून भुईमूग पेरा १८ टक्के झाला आहे. त्यामुळे खरीप लागवड लांबणीवर पडली तर त्याचा उत्पादन वाढीवर परिणाम होणार आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने अर्धपोटी राहून दिवस काढावे लागत आहेत. पाऊस बरसला तर मजुरांना रोजगार उपलब्ध होईल. (Monsoon Delay Paddy planting in Pot only 2 percent)

त्यामुळे आदिवासी बळीराजासह शेतमजूर आकाशाकडे नजर लावून बसला आहे. पेठ हा दऱ्या-डोंगरांनी नटलेला आदिवासी तालुका असून जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाळ्यात सरासरी सुमारे २८०० ते ३००० मिमीपर्यंत पाऊस होतो. गत वर्षात जून महिन्यात सुमारे ७०० ते ८०० मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र जूनअखेर टप्प्याटप्प्याने दोन-तीन दिवस मेघ बरसल्याने २५३ मिमी पाऊस झाला.

परिणामी मातीत ओल नसल्याने कर्ज काढून घेतलेली भात, नागली, वरईची बियाणे घरात पडून आहेत. तर भात, नागलीची रोपे निंबार होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाने ओढ दिल्याने भात, नागलीच्या लागवडीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी आहे. तालुक्यात बागाईत शेतीत भात लागवड झाली असून पावसाअभावी अख्खा तालुका ओकाबोका दिसत असून विहिरींनी तळ गाठलेलाच आहे.

खरीप हंगामाचा मंगळवार अखेर अहवाल

पिकाचे नाव उद्दिष्ट क्षेत्र लागवड क्षेत्र -टक्के

हेक्टर हेक्टर

१) भात ९४५२ .२० १७४ २%

२) नागली ७१२४ ---- ----

३) वरई १६२६ ------ ------ (latest marathi news)

एकूण तृणधान्य - १८२१२ १७४

४) तूर १०७० १०० ९%

५) उडीद २५८० ------ -------

६) इतर कडधान्य १३३५ -------- -------

एकूण खरीप कडधान्य ४९८५ १००

एकूण खरीप अन्नधान्य २३१९७.४० २७४

७) भुईमूग १४५१ २५५ १८%

८) खुरासणी २१८९ ------ ----

९) इतर खरीप गळीत धान्य १६६ ---- ----

एकूण खरीप गळीत धान्य ३८०६ २५५ -----

एकूण खरीप पिके २७००३.४० ५२९

(ऊस वगळून)

"महागडे बियाणांची खरेदी करून खतांचा साठा केला. हाती पैसा नसला तरी पिकून आल्यावर विकून कर्ज फेडीन या आशेवर कर्ज घेतले, मात्र दररोज पाऊस हुलकावणी देत असल्याने भात, नागलीची रोपे तयार असूनही मातीचा गारा झाल्याशिवाय रोपांची लागवड करता येत नाही. पावसाने मुबलक बरसावे, अशी आळवणी मेघराजास आहे." - यशवंत गावंडे, प्रगतशील शेतकरी गावंधपाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने भारताची चिंता वाढली! सेमीफायनलमधील शेवटच्या जागेसाठी न्यूझीलंडशी शर्यत; पाहा समीकरण

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्ध सामना कुठे फिरला, ज्यामुळे भारताचा झाला ४ धावांनी पराभव, हरमनप्रीत कौरने बोलून दाखवली मनातलं दु:ख

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT