Nashik Monsoon News  esakal
नाशिक

Nashik Monsoon Update : मंगळवारी शून्‍य मिलिमीटर पावसाची नोंद! पावसाची दडी, आद्रतेने उकाडा

Nashik News : हवामान खात्‍याने पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी मंगळवारी (ता.९) दिवसभर शून्‍य मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्‍याने पार्यात वाढ झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : हवामान खात्‍याने पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी मंगळवारी (ता.९) दिवसभर शून्‍य मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्‍याने पार्यात वाढ झाली होती. पावसाने दडी मारली असली तरी आद्रतेमुळे उकाडा वाढला होता. यंदाच्‍या पावसाळी हंगामात रिमझिम सरींनी फारसा दिलासा मिळू शकलेला नाही. एकीकडे राज्‍यभर मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळित झाल्‍याचे दृष्य समोर येत आहेत. (Nashik Monsoon Update)

मुंबईला विक्रमी पावसाची नोंद झालेली असताना, पुण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज पाहता शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. राज्‍यातील इतर शहरांमध्येही मुसळधार पावसाची नोंद घेण्यात आली आहे. परंतु नाशिकमध्ये केवळ पावसाचा शिरकाव होत असल्‍याने नागरिकांच्‍या चिंतेत वाढ झालेली आहे.

हवामानखात्‍याने नाशिकसाठीदेखील अलर्ट देताना मंगळवारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्‍यक्‍त केला होता. मात्र दिवसभर पाऊस बरसला नाही. सकाळी अकराच्‍या सुमारास शहरातील अनेक भागात ऊन पडले होते. (latest marathi news)

यानंतर आकाश ढगांनी दाटले होते. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस बरसला नाही. आद्रतेत वाढ झाल्‍यामुळे उकाड्यामध्ये कमालीची वाढ झाली होती. दरम्‍यान मंगळवारी किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस, कमाल तापमान २९.४ अंश सेल्‍सीयसची नोंद घेण्यात आली आहे.

जुलै महिना कोरडा

मे महिन्‍यात वाळवीचा पाऊस झाल्‍यानंतर जूनमध्येही काहीप्रमाणात रिमझिम पाऊस झाला होता. परंतु जुलैमधील एकूण नऊ दिवसांपैकी पहिला दिवस वगळता इतर बहुतांश दिवस कोरडेच राहिले. १ जुलैला जोरदार पाऊस झालेला असताना, सुमारे चाळीस मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली होती. त्‍यानंतरचे दिवस कोरडेठाक राहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 Splashdown Video: चंद्रावरील एक ऐतिहासिक प्रवास पूर्ण NASA चे वीर परतले, चंद्रावरुन पृथ्वीवर उतरण्याचा अद्भुत व्हिडिओ

IPL 2026: धडाकेबाज पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आज कोण मारणार बाजी; कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : परभणी, नांदेड हिंगोलीला भूकंपाचे धक्के

Ambabai Temple Kolhapur : अंबाबाई मंदिराच्या गर्भात दडलंय मोठं रहस्य? उत्खननात सापडल्या गरुड मंडपाच्या प्राचीन पायऱ्या, संवर्धनावेळी ऐतिहासिक ठेवा समोर

मृत्यूनंतरही दुर्दैवाचा फेरा! सासरच्यांसह आई-वडिलांनीही पाठ फिरवली; पतीनं हत्या केलेल्या पूजावर पोलिसांकडून अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT