Muharram Festival Police Security esakal
नाशिक

Nashik Muharram Festival : मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त! संवेदनशील ठिकाणांवर करडी नजर

Nashik News : शहरातील संवेदनशील ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे.

विजय कांबळे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Muharram Festival : मुस्लिम बांधवांचा मोहरम आणि आषाढी एकादशी हे सण बुधवारी (ता. १७) एकाच दिवशी साजरे होत आहेत. यासाठी शहर आयुक्तालय हद्दीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच, शहरातील संवेदनशील ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. (Nashik Muharram festival tight security in city)

आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने अशाठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. तर, त्याचवेळी मुस्लिम बांधवांचा मोहरम सण असल्याने यानिमित्ताने भद्रकाली, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, अंबड, सातपूर या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे शहर गुन्हेशाखांची पथके साध्या वेशात शहरात गस्तीवर राहणार आहेत. सर्व प्रमुख धर्मस्थळे, बस व रेल्वे स्थानकांमध्ये घातपातविरोधी पथकाकडून मंगळवारी (ता. १६) तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच, राखीव दलाच्या तुकडीसह दंगलविरोधी व शिघ्रकृती दलाची पथकांनाही सज्जतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. (latest marathi news)

असा आहे बंदोबस्त

उपायुक्त - ४

सहायक आयुक्त - ७

पोलीस निरीक्षक - २४

सहायक तथा उपनिरीक्षक - ६७

पोलीस अंमलदार - ५९५

महिला अंमलदार - १०४

शीघ्रकृती दल - २ (तुकड्या)

आरसीएफ - १ तुकडी

एसआरपीएफ - २ तुकड्या

होमगार्ड पुरुष - ५००

होमगार्ड महिला - २००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात ७० गँग कार्यरत... घायवळला सरकारचं पाठबळ; अनिल परबांनी थेट शस्त्र परवान्याची प्रोसेसच सांगितली, योगेश कदम अडचणीत!

Video : काव्याला वाचवताना पार्थचा जीव जाणार ? प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले की "आता ती मानिनी..."

Diwali Special Faral Recipe: पहिल्यांदाच भाजणीची चकली करताय? मग स्टेप बाय स्टेप जाणून घ्या पद्धत, सर्वजण करतील कौतुक

Leopard In Kolhapur : पन्हाळगड पायथ्याजवळ आढळला मृत बिबट्या, कारण अद्याप अस्पष्ट

Donald Trump : दिवाळीआधी डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला खास गिफ्ट; 'या' क्षेत्रातील कंपन्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT