nashik muncipal elections NCP criticizes BJP marathi news
nashik muncipal elections NCP criticizes BJP marathi news 
नाशिक

भाजपचे नाशिकवरचे प्रेम पुतणामावशीचे; प्रभागनिहाय बैठकांमध्ये राष्ट्रवादीचा घणाघात 

विक्रांत मते

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने मिशन प्रभाग मोहीम हाती घेतली असून, शुक्रवारी (ता. २५) सिडको व सातपूर भागात झालेल्या बैठकांमध्ये स्थानिक समस्या मोठ्या प्रमाणात मांडण्यात आल्या. या वेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी भाजपचे नाशिकवरचे प्रेम पुतणामावशीचे असल्याचा घणाघात केला. 

भाजपने दत्तक घेतल्यापासून विकास खुंटला...

सिडको विभागातील प्रभाग २४ व २९, सातपूर विभागातील प्रभाग १० व ११ तसेच, पश्चिम विभागातील प्रभाग ७ व १२ मध्ये बैठक झाली. बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी समस्या मांडताना सत्ताधारी भाजपविरोधातील असंतोष व्यक्त केला. भाजपने नाशिक दत्तक घेतल्यापासून शहराचा विकास खुंटला. नागरिकांच्या या असंतोषाला निवडणुकांच्या माध्यमातून वाट मोकळी करून देण्याचे आवाहन शहराध्यक्ष ठाकरे यांनी केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्याचा फायदा महापालिका काबीज करण्यासाठी निश्चित होईल, असा विश्‍वास नाना महाले यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या वाढत असल्याचा दावा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी केला. डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष अमोल वाजे, दत्ता पाटील, अमोल महाले, संजय खैरनार, बाळासाहेब सोनवणे, विभागाध्यक्ष मकरंद सोमवंशी, पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पा राठोड, ज्योती पाटील, अजय पाटील, विभाग कार्याध्यक्ष सुनील अहिरे, बाळा निगळ आदी उपस्थित होते. 

नागरिकांनी या मांडल्या समस्या 

पिंपळगाव बहुला मळे परिसरात पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह, रस्ते व दिवे यासह बिबट्यांचा वावर, औद्योगिक वसाहतीत रस्त्यावरील बंद दिवे, वीजतारा भूमिगत करणे या समस्या मांडल्या. पश्चिम विभागात झोपडपट्टी भागातील शौचालये व उद्यानांची दुरवस्था, गुन्हेगारीत झालेली वाढ या समस्या मांडल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT