vegetables market sakal media
नाशिक

नाशिक : आकाशवाणी टॉवरजवळ भाजी विक्रेत्यांची दादागिरी

अतिक्रमण अधिकाऱ्यांचे लागेबांधे; २५ पत्रे देऊनही कारवाई नाही

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोडवरील (Gangapur road) आकाशवाणी टॉवरजवळ (Akashwani tower) महापालिकेने (Nashik municipal corporation) कोट्यवधी रुपये खर्च करून भाजी मार्केट (vegetable market) उभारले, परंतु त्या जागेचा वापर भाजी विक्रेते वाहने पार्किंगसाठी (vehicle parking) करत आहेत. रस्त्यावर भाजी विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडूनही कारवाई होत नसून विक्रेत्यांशी लागेबांधे असल्याचा आरोप या भागातील नगरसेवक योगेश हिरे (yogesh hire) यांनी केला असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा (strike warning) दिला.

स्थायी समितीच्या सभेत आकाशवाणी टॉवर जवळील भाजी बाजाराच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. नगरसेवक हिरे यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक सातमधील आकाशवाणी टॉवर जवळील अनधिकृत भाजी बाजाराचा मुद्दा छेडताना गंभीर आरोप केले. महापालिकेने भाजी मार्केट बांधूनही विक्रेते त्या जागेत न बसता रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक ठप्प होते. ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ, २२ क्लासेस या भागात आहे. त्यात भाजी विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक ठप्प होते. शंभर मीटर अंतर पार करण्यासाठी वीस ते बावीस मिनिटे लागतात. एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक नगरसेवकांनी अतिक्रमण विभागाला २५ पत्रे देवूनही कारवाई करत नसल्याने अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप नगरसेवक हिरे यांनी केला. भाजी विक्रेत्यांकडून रस्त्याच्या कडेला अस्वच्छता केली जाते. हाणामारीचे प्रकार वांरवार होतात. त्यामुळे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. सातपूर विभागात नगरसेविका माधुरी बोलकर यांनी अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला, तर प्रतिभा पवार यांनी अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच पुन्हा जैसे- थे परिस्थिती होत असल्याचे निदर्शनास आणले.

राष्ट्रवादी आक्रमक, आंदोलनाचा इशारा

अनधिकृत भाजी बाजारावर राष्ट्रवादी काँग्रेसदेखील आक्रमक झाली असून, ओट्यांचे वाटप होवूनही विक्रेते रस्त्यावर बसत असल्याचे सांगताना या विरोधात अनेकदा निवेदने देवूनही कारवाई होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्य विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष किशोर शिरसाट यांनी केला. अनधिकृत भाजी बाजारामुळे वाहतूक ठप्प होण्याबरोबरच गुंडगिरी सारख्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT