nashik muncipal corporation Google
नाशिक

नाशिक मनपाची थकबाकीदारांसाठी अभय योजना; मिळणार ९० टक्‍क्‍यांपर्यंत सूट

विक्रांत मते

नाशिक : आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी महापालिकेकडून पुन्हा घरपट्टी थकबाकी असलेल्या थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. १६ ऑगस्टपासून तीन टप्प्यांमध्ये ही योजना लागू होणार असून, योजनेंतर्गत दंडाची रक्कम व नोटीस फीमध्ये ९० टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरामध्ये महापालिकेच्या पावणेपाच लाख मिळकती आहे. दीड वर्षांपासून कर वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झाली आहे. शहरात १ लाख ८० हजार मिळकत धारक थकबाकीदार झाले आहेत. त्यांच्याकडे २४९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. जानेवारी महिन्यापासून महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या, मात्र पुरेशी वसुली झाली नाही. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून सवलत योजना लागू करण्यात आली. त्याचाही फायदा झाला नाही. महापालिकेच्या माध्यमातून घरपट्टी विलंबाने भरल्यास त्यावर दर महिन्याला दोन टक्के शास्ती केली जाते. मात्र, दीड वर्षांपासून शास्ती आकारली गेली नाही. असे असतानादेखील पुरेशा प्रमाणात घरपट्टीचे थकबाकी वसुली नाही. त्यामुळे आता थेट कारवाई न करता १६ ऑगस्टपासून अभय योजना थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन टप्प्यांमध्ये योजना लागू केली जाणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये दंड व नोटीस फीमध्ये ९० टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात ७० टक्के तिसऱ्या टप्प्यामध्ये ५० टक्‍के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

३१ डिसेंबरपर्यंत सूट

१६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये शास्ती व नोटीस फी मध्ये ९० टक्के सूट दिली जाणार आहे. १६ ऑक्टोबर ते ३१ नोव्हेंबर या कालावधीत मध्ये ७० टक्के सूट दिली जाणार आहे ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये शास्त्री व नोटीस हिचा रकमेमध्ये ५० टक्के सूट दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Who is Sameer Rizvi: वडिलांना ब्रेन हॅमरेज... CSK ची ८ कोटीची बोली अन् आता DC साठी गाजवतोय मैदान, जाणून घ्या समीरची कहाणी

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

SCROLL FOR NEXT