nashik municipal corporation  
नाशिक

नववर्षात महापालिका होणार मालामाल; प्रीमियम एफएसआय, विकास शुल्काचा परिणाम 

विक्रांत मते

नाशिक : राज्य शासनाने बांधकामांसाठी संपूर्ण राज्यासाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली जाहीर केली असून, त्यात महापालिकेला उत्पन्नाचे साधन म्हणून प्रीमियम एफएसआय सशुल्क करण्यात आले. परिणामी, महापालिका मालामाल होणार आहे. वर्षभरात महापालिकेच्या तिजोरीत पाचशे कोटींचा महसूल पडणार असला, तरी जीएसटी बंद करण्याच्या हालचाली असल्याचे बोलले जात आहे. 

महापलिकेला वार्षिक पाचशे कोटी उत्पन्न

महापालिकेच्या उत्पन्नात जीएसटी, घरपट्टी, पाणीपट्टी, विविध कर तसेच नगररचना विभागाकडून प्राप्त होणाऱ्या विकास शुल्काचा मोठा वाटा असतो. नाशिक महापालिकेला ‘जीएसटी’तून ९८४ कोटी रुपये शासनाकडून प्राप्त होतात, तर घरपट्टी व पाणीपट्टीच्या उद्दिष्टांपैकी साधारण दीडशे कोटी रुपये उत्पन्न मिळते. गेल्या काही वर्षांत नगररचना विभागाकडून वसूल केल्या जाणाऱ्या विकास शुल्कातून चांगली रक्कम पदरात पडत आहे. दोन वर्षांत पाचशे कोटींहून अधिक उत्पन्न तिजोरीत जमा झाले आहे. या उत्पन्नात आता अधिक वाढ होणार आहे. शासनाने बांधकामविषयक नियमावली जाहीर करताना प्रीमियम एफएसआय सशुल्क केला आहे. यापूर्वीच्या विकास नियंत्रण नियमावलीत बाल्कनी, जिना, टेरेस तसेच व्हरांडा आदीसाठी फ्री एफएसआय होता. नव्या नियमावलीत या बाबी एफएसआयमध्ये समाविष्ट केल्या. याचाच अर्थ अतिरिक्त एफएसआयसाठी शुल्क आकारले जाणार आहे. एकूण मिळणाऱ्या उत्पन्नापैकी निम्मे उत्पन्न शासनाच्या, तर निम्मे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. यातून नाशिक महापलिकेला वार्षिक पाचशे कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. 

‘जीएसटी’ बंद करण्याच्या हालचाली 

जकात बंद करून एलबीटी करप्रणाली आली. त्यानंतर शासनाने ‘जीएसटी’ लागू केला. ‘जीएसटी’ अनुदानापोटी महापालिकेला मासिक ८४ कोटी रुपये शासनाकडून प्राप्त होतात. आता जीएसटी बंद करण्याचा निर्णय शासन पातळीवर घेतला जात असून, त्यासाठी प्रीमियम शुल्कातून महापालिकेला उत्पन्नाचे नवे साधन निर्माण करून देण्याचा भाग असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT