नाशिक

NMC News : महापालिका चालविणार 50 इलेक्ट्रिकल बस; डिझेल बस बंद करण्याचे नियोजन

NMC : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून शहरात चालविल्या जाणाऱ्या बसमध्ये आता इलेक्ट्रिक बसची भर पडणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून शहरात चालविल्या जाणाऱ्या बसमध्ये आता इलेक्ट्रिक बसची भर पडणार आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या १०० पैकी ५० बस महापालिकेला प्राप्त होतील. बससाठी महापालिकेला प्रतिकिलोमीटर ७९ ते ७५ रुपये मोजावे लागणार आहे. भविष्यात प्रदूषणकारी डिझेल बस बंद करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून ग्रॉस कॉस्ट कटिंग या तत्त्वावर बससेवा चालविली जाते. (nashik Municipal corporation will run 50 electric buses in city marathi news)

सद्यःस्थितीत २५० बस चालविल्या जातात. यातील दोनशे बस सीएनजी इंधनावर, तर ५० बस डिझेलवर चालविल्या जातात. पीएम योजनेअंतर्गत महापालिकेला शंभर इलेक्ट्रिकल बस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यातील ५० बस महापालिकेने चालविण्याची तयारी दाखवली आहे. ग्रॉस कॉस्ट कटिंग या तत्त्वावर करारनामा करण्यात आल्याने महापालिकेला प्रत्येक बस रस्त्यावर धावली नाही तरी दोनशे किलोमीटरचे पैसे द्यावे लागतात.

साधारण ८० ते ८५ रुपये प्रतिकिलोमीटर असा दर आहे. सद्यःस्थितीत महापालिकेला ४५ ते ५० रुपये उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे दर किलोमीटरमागे जवळपास ४२ रुपयांपर्यंत तोटा असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. आता पीएम योजनेंतर्गत पन्नास इलेक्ट्रिकल बस प्राप्त होणार असल्याने या बसचा खर्चदेखील महापालिकेला द्यावा लागणार आहे. (latest marathi news)

इलेक्ट्रिकल बससाठी जवळपास ७५ रुपये किलोमीटर असा दर द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर दोनशे किलोमीटर बस चालविणे बंधनकारक आहे. इलेक्ट्रिक बससाठी प्रतिकिलोमीटर बावीस रुपये अनुदान स्वरूपात केंद्र सरकारकडून महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे ५० ते ५५ रुपये प्रतिकिलोमीटर मागे महापालिकेला अदा करावे लागणार आहे.

पन्नास बससाठी दिवसाला जवळपास साडेसात लाख रुपये महापालिकेला अदा करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर करारनामा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुढील वर्षापर्यंत ताफ्यात

सिटीलिंक कंपनीचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यःस्थितीत अडीचशे बस चालल्या जातात. यातील दोनशे बस सीएनजी, तर ५० बस डिझेलवर चालविल्या जातात. केंद्र शासनाकडून ५० इलेक्ट्रिकल बस पुढील वर्षापर्यंत प्राप्त होतील. त्यामुळे पन्नास डिझेलच्या बस बंद करून त्याऐवजी ५० इलेक्ट्रिकल बस रस्त्यावर उतरविण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Latest Marathi News Live Update: केरळमध्ये आमची बाजू कमकुवत असली तरीही भाजपचेच राज्य येईल - भाजप खासदार मनोज तिवारी

Nandur Sarpanch Election: दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विशाल थोरात सरपंचपदी विजयी; संतोष बबन बोराटे यांना धक्का

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

SCROLL FOR NEXT