Nashik Municipal Election NCP ready to lead other than BJP Chhagan Bhujbal sakal
नाशिक

नाशिकमध्ये भुजबळांकडून आघाडीचे संकेत, भाजपबद्दलही स्पष्टच बोलले!

छगन भुजबळ : महापालिका निवडणूक आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी भाजप वगळता इतर पक्षांशी-गटांशी आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे, असा पुर्नउच्चार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता.४) येथे केला. राष्ट्रवादी भवनात पक्षाच्या झालेल्या महापालिका निवडणूक आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, माजी आमदार जयवंत जाधव, डॉ. अपूर्व हिरे, नानासाहेब महाले, दिलीप खैरे, गटनेते गजानन शेलार, डॉ. शेफाली भुजबळ, निवृत्ती अरिंगळे, शिवाजी सहाणे, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे आदी उपस्थित होते. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्या आहेत. आरक्षणासह इतर प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये महापालिका निवडणूकविषयक तयारीचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की प्रभागनिहाय नेमकी काय स्थिती आहे याची माहिती आजच्या बैठकीत घेण्यात आली. आगामी निवडणुकीत पक्षाची चांगली कामगिरी कशी करता येईल या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला आहे.

भाजपची लाट ओसरली

भारतीय जनता पक्षाची देशातील लाट ओसरली आहे. तसेच, महापालिकेतील कामकाजाच्या पद्धतीमुळे शहरात लाट राहिलेली नाही. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. त्या दृष्टीने कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले. विभागनिहाय कामकाजाचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

कायदा हातात घेणे निषेधार्ह

ओवीसी यांच्यावरील हल्ल्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. भुजबळ म्हणाले, की एकमेकांवर हल्ले करणे गैर आहे. प्रचार करता येऊ नये म्हणून अडथळे आणले जाऊ नयेत. बोलण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे कायदा हातात घेऊन गोळ्या झाडणे निषेधार्ह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडील गेले, घरची जबाबदारी खांद्यावर आली; दिवसा बांधकामावर मजुरी अन् रात्री अभ्यास, अभिषेक बनला अधिकारी! पण यश बघायला बाप नसल्याने भावूक

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत भयानक पाऊस; २४ तासांत ५० गावांचा संपर्क तुटला

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

SCROLL FOR NEXT