Seventh Pay Commission esakal
नाशिक

Seventh Pay Commission : सातव्या वेतन आयोगाचा हप्ता रोखीने अदा करावा; म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा आंदोलनाचा इशारा

Seventh Pay Commission : म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने केली असून फरक अदा न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Seventh Pay Commission : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा चौथा व पाचवा हप्ता रोखीने अदा करावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने केली असून फरक अदा न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिले. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीचा फरक समान पाच हप्त्यात रोखीने अदा करण्याबाबत निर्णय झाला आहे.

महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र वेतन फरकाचा चौथा व पाचवा हप्ता अद्याप अदा झालेला नाही. शासन निर्णय विचारात घेऊन शासनाच्या धर्तीवर मनपा आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना वेतन फरकाचे उर्वरित दोन्ही हप्ते ऑगस्ट २०२४ मध्ये रोखीने अदा करण्याची मागणी निवेदनात केली आहे. एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार देय असलेल्या उपदान, पेन्शन विक्री व इतर फरकाच्या सर्व रक्कमही ऑगस्ट २०२४ मध्ये अदा कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली आहे.(latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT