खून sakal
नाशिक

खूनसत्राने हादरले नाशिककर; महिनाभरात चार खून

शहरात गुन्‍हेगारीचा आलेख उंचावत चालला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अपघाती मृत्‍यू कमी करण्यासाठी एकीकडे पोलिस आयुक्‍त दीपक पांडे यांच्‍याकडून हेल्मेट सक्‍तीवर जोर दिला जात आहे. दुसरीकडे शहरात गुन्‍हेगारीचा आलेख उंचावत चालला आहे. चार दिवसांत खुनाच्‍या तीन घटना घडल्‍या असून, महिनाभरात चार खून झाले आहेत. याशिवाय चेन स्नॅचिंगच्‍या घटनांसह दुचाकी चोरी व अन्‍य गुन्‍हेगारीत वाढ झालेली आहे. खूनसत्राने हादरलेल्‍या नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा वचक कमी झाल्याची भावना नाशिककरांमध्ये तयार झाली आहे.

हेल्‍मेट सक्‍तीसाठी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा नारा देताना अंमलबजावणीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना पंपांवर तैनात केले आहे. सामान्‍य नागरिकांना हेल्‍मेट सक्‍तीपासून अन्‍य विविध पातळ्यांवर नियमांची जाणीव करून दिली जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरात गुन्‍हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्‍याची स्‍थिती आहे. खून सत्रांमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात गंगापूर रोडवरील संत कबीरनगर झोपडपट्टीत पॅरोलवर आलेल्या संशयिताने एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करत खून केला.

मात्र, त्यानंतर म्हसरूळ येथील सराईत प्रवीण काकड याचा खून करण्यात आला. दोन खुनाचे सत्र थांबत नाही, तोच पंचवटी येथील भाजीपाला व्यावसायिक राजेश शिंदे यांचादेखील खून करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी (ता.२६) सकाळी सातपूर येथील भाजप पदाधिकारी अमोल इघे यांचादेखील भल्या पहाटे खून करण्यात आला. शहरात गेल्या काही दिवसांत चार खुनाच्या घटना घडल्यानंतर उपनगरांमध्ये चेन स्‍नॅचिंगच्‍या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. दुचाकी व घरफोडी सत्रदेखील सुरूच आहे. शहरात पोलिसांचा वचक राहिला का नाही, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.

उपक्रम बंद की सुरू?

शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याच्या उद्देशाने माजी पोलिस आयुक्त यांच्याकडून अनेक उपक्रम राबविण्यात आले. यात झोपडपट्टीमध्ये ऑलआऊट, कोम्बिंग ऑपरेशन राबवीत गुन्हेगारीवर वचक ठेवला तर पोलिस रस्त्यावर दिसला पाहिजे या हेतूने पोलिस ठाण्यात विभागनिहाय पेट्रोलिंगसाठी क्यूआर कोड ही प्रणाली सुरू करण्यात आली होती. यामुळे पोलिस रस्त्यावर दिसत असल्याने गुन्हेगारीवर वचक बसला होता. मात्र आता सर्व उपक्रम बंदच आहे असे, वाटू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT