The rush of customers to buy Nagli required to make papad.  esakal
नाशिक

Nachani Rates Hike: नागलीच्या पापडची चव महागणार! कमी उत्पादनामुळे भावात पायलीमागे 50 रुपयांनी वाढ

Nashik News : नागलीचे भाव वाढले असले तरी ग्राहकाकडून खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नरकोळ : उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात वडे, पापड, कुरडया आदी पदार्थ बनविण्याची गृहिणींची लगबग सुरू झाली असली तरी यंदा कमी उत्पादनामुळे यंदा भावात पायलीमागे किमान ५० ते ६० रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा पापडाची चव तोडी महागणार आहे. नागलीचे भाव वाढले असले तरी ग्राहकाकडून खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Nashik Nachani Rates Hike marathi news)

कसमादेत पारंपरिक नागलीचे पापड घराघरात तयार केले जातात. आदिवासी पट्ट्यात प्रामुख्याने नागलीचे उत्पन्न घेतले जाते. पापडासाठी नागली खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे. गेल्यावर्षी सात किलो (एक पायली) नागलीला २०० ते २२० रुपये भाव होता.

यावर्षी २५० ते २७० रुपये दर आहे. जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात नागलीचे उत्पन्न घेतले जाते. गतवर्षी पावसाळा जेमतेम झाल्याने नागलीचे उत्पन्नात घट झाली. त्यामुळे यंदा दर वाढल्याचे उत्पादकांनी सांगितले. (Latest Marathi News)

नागली खाण्याचे फायदे -

* आवश्यक प्रथिने, कार्बोदके, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात.

* नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त

* गर्भवती महिलांसाठीही नाचणी अतिशय पौष्टिक समजली जाते. त्यामुळे अर्भकाची वाढ चांगली होण्यास मदत होते.

* मधुमेही व्यक्तींना रोज नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल नागलीमुळे नियंत्रणात राहायला मदत होते. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नागली उपयुक्त आहे.

"पावसाळ्यात भात लावणी झाल्यानंतर नागलीची डोंगर उताऱ्यावरील जमिनीत आम्ही लागवड करतो. गतवर्षी पावसाळा कमी झाल्याने उत्पादन घटले. कमी उत्पादनामुळे थोडे भाव वाढले. तरीही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात आजही नागलीच्या पापडांनाच प्राधान्य दिले जात आहे." - केवळ सोनवणे, नरकोळ, ता. सटाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT