Rahul Jadhav felicitating Amol Khairnar who came first in the state in the Medical Education Research and Life Directorate Examination. esakal
नाशिक

Nashik News : नगरसूलचा अमोल राज्यात प्रथम; आयुष्य संचालनालय भरतीत मिळविले यश

Nashik : शेतात राबविणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करण्यासाठीच त्यांना शेती कामाला मदत करून अभ्यासाला परिश्रमाची जोड दिसल्यास यशाचे शिखर गाठता येत असल्याचे सिद्ध केलंय येवला तालुक्यातील नगरसुल येथील शेतकरी दिलीप आणि लता खैरनार यांच्या मुलगा अमोलने.

सुदाम गाडेकर

Nashik News : शेतात राबविणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करण्यासाठीच त्यांना शेती कामाला मदत करून अभ्यासाला परिश्रमाची जोड दिसल्यास यशाचे शिखर गाठता येत असल्याचे सिद्ध केलंय येवला तालुक्यातील नगरसुल येथील शेतकरी दिलीप आणि लता खैरनार यांच्या मुलगा अमोलने. अमोल याने वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या वाहनचालक पदासाठी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. (Nashik Nagarsul success in first life directorate recruitment in Amul state marathi news)

नगरसूल येथे आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमोलने कोपरगाव (जि. नगर) येथून इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा पूर्ण केले. सततच्या शेतीच्या कामात गुंतलेले कुटुंब. आई-वडिलांचे जेमतेम शिक्षण. अशा परिस्थितीत अमोलने स्पर्धा परीक्षा तयारी करण्याचे ठरविले. शिक्षण घेताना आपली नाळ शेतीशी घट्ट ठेवून शेतीची कामे,वखरणी,नांगरणी,रात्री-अपरात्री पिकाला पाणी देणे.

मजूर मिळत नसल्याने कांदा लागवड, कापूस वेचणी ही अमोलची नित्याचीच कामे होते. ही कामे करत त्याने येवला येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये नियमित अभ्यास केला. याच दरम्यान त्याने वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य संचालनालय विभागातर्फे निघालेल्या परीक्षेत वाहन चालक पदासाठी अर्ज केला. (latest marathi news)

या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. परीक्षेत अमोल याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. अमोलच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे संचालक राहुल जाधव, किशोर गाडेकर, अविनाश कोटमी आणि विद्यार्थ्यांनी त्याचा सत्कार केला.

''कुटुंबाला हातभार म्हणून मिळालेली संधी समाजाच्या सेवेसाठी सत्कारणी लावीन. ग्रामीण माणसांच्या सेवेसाठी मी कटिबद्ध राहील.''-अमोल खैरनार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT