Suvarna Singh Jadhav and laborers packing bananas for export to Saudi Arabia. esakal
नाशिक

Nashik Agriculture News: नांदगावची केळी सौदी अरेबियात खाणार भाव! बोराळेच्या राजपूत कुटुंबियांचा प्रयोग यशस्वी; लाखोंची उलाढाल

Nashik News : यावर्षी केळीची वारी सौदी अरेबियाला केली जात आहे. जोडीला कापूस, ऊस, कांदा, पपई बहुविध पिकांमधूनही त्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे.

भगवान हिरे

साकोरा : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील राजपूत कुटुंबाने गिरणा नदीकाठी आपल्या लाल, तांबूस, केवटामिश्रित जमिनीत निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेत बाजारपेठेत विशेष ओळख तयार केली आहे. आतापर्यंत इराण, इराक येथे केळी पाठवली होती. यावर्षी केळीची वारी सौदी अरेबियाला केली जात आहे. जोडीला कापूस, ऊस, कांदा, पपई बहुविध पिकांमधूनही त्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. (Nashik Nandgaon bananas export to Saudi Arabia Borale Rajput family marathi news)

भिलासाहेब राजपूत कुटुंबाची गिरणा नदीकाठी ५५ एकर बागायती शेती असून, लहान भाऊ दादाभाऊ सोळुंके, साहेबराव सोळुंके, भाचे सुवर्णसिंग जाधव, पुतण्या नितेंद्र सोळुंके यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांची कामात मदत होते. लहान पुतण्या बलरामसिंग राजपूत याला विदेशी बाजारपेठेच्या अभ्यासासाठी आफ्रिका, दुबई, थायलंड, इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत या देशांमध्ये पाठविले. आधी अभ्यास केला, मग स्वतः आपल्या शेतातील व परिसरातील शेतकऱ्यांच्या मालाची निर्यात सुरू केली. आज ते स्वतः कांदा, केळी व कापूस विदेशात निर्यात करीत आहे.

बोराळे ते सौदी अरेबिया प्रवास

केळीची कटाई करून साफ केली जाते. नंतर तुरटीच्या पाण्यात धुवून ताजी केली जाते. एका बॉक्समध्ये १३ किलो प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग करून बॉक्समधील हवा काढली जाते. हा माल पिंपळगाव येथील अर्चिड शीतगृहात ठेवला जातो.

कंटेनरचा माल पूर्ण झाल्यानंतर तो उरणच्या ‘जेएनपीटी’ बंदरातून जहाजातून सौदी अरेबियाच्या बंदरात पाठवला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी निलेश राजपूत त्यांना मदत करतात. शेतकऱ्यांशी सुसंवाद साधत प्रत पाहून शेतमाल पसंत केला जातो. तसेच, पत्नी पूजा राजपूत या आर्थिक व्यवहार बघतात. (Latest Marathi News)

केळीचे एकरी उत्पन्न

- ३५० ते ४०० क्विंटल
- २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल दर
- एकरी उत्पन्न ६ ते ७ लाख रुपये

सरासरी एकरी खर्च

मशागत करणे : ५ हजार
ठिबक सिंचन : ४० हजार
केळी रोप (जी ९) : २८ हजार
शेणखत : २० हजार
रासायनिक खत : ४० हजार
वॉटर सुलेबल मटेरियल : १६ हजार
लहान रोप ड्रीचिंग खर्च : ६ हजार
मजुरी : २० हजार
एकूण सरासरी खर्च : १ लाख ७५ हजार

"मी आतापर्यंत जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर या चार जिल्ह्यातून केळी इराण, इराकला निर्यात पाठवली आहे. तर दुबई येथे कांदा पाठवला आहे. केळीसाठी आमचे उद्दिष्ट रशिया, इटली व युरोप येथे करणार आहोत. लवकरच आमचे स्वतःचे पॅकहाऊस तयार होईल आणि त्यातून दर्जेदार माल निर्यात करू."- बलरामसिंग राजपूत, केळी निर्यातदार, बोराळे

"मी कापूस खरेदी अधिकारी म्हणून गुजरातला काम केले आहे. पुतण्या बलरामसिंग याच्यासह जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल निर्यातक्षम कसा बनवावा व त्यापासून उत्पन्न कसे अधिक मिळेल, याचे मार्गदर्शन करीत आहे."

- भिलासाहेब राजपूत, बोराळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT