overflow lake esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain : नांदगावला वादळवारे अन विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Unseasonal Rain : गेल्या काही दिवसापासून पाणी टंचाईच्या समस्येने बेजार असलेल्या साकोरा परिसराला या अवकाळी पावसाने एकप्रकारे दिलासा दिला.

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अवकाळी पावसाने दुष्काळाने होरपळणाऱ्या तालुक्यात जोरदार हजेरी लावली. रात्री साडे आठ नंतर हलक्या गारा पडू लागल्यानंतर अचानक वादळवारे व विजांच्या गडगडाटासह अवकाळीचा पावसाने जोरदार हजेरी लावली. (Nashik Nandgaon heavy unseasonal rain)

सकाळी आठ वाजेपर्यंत 102 मिली एवढ्या पावसाची नोंद शहरातील पर्ज्यनामापक यंत्रात करण्यात आली. गेल्या काही दिवसापासून पाणीटंचाईच्या समस्येने बेजार असलेल्या साकोरा परिसराला या अवकाळी पावसाने एकप्रकारे दिलासा दिला. मोरखडीच्या बंधाऱ्यात निम्म्याहून अधिकचा जलसंचय झाल्याने आजूबाजूच्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत झाली. गंगाधरी गावाच्या वरच्या डोंगररांगेतून रात्री उशिरा नदीनाल्या एकत्रित दुथडी भरून वाहू लागल्या.  

लावल्याने बहुतांश भागात शेतात पाण्याचे तळे साचले ऐन टंचाईच्या काळात आलेला अवकाळी पाऊस काही ठिकाणी नुकसानकारक ठरत असला तरी भूगर्भातील जलाशयाच्य़ा पातळीला पूरक ठरला आहे. विहिरींना पाणी लागले तर नालाबल्डींग ओसंडून वाहिले. (latest marathi news)

कळमदरी येथे वीज कोसळून गाय मरण पावली तर कासारीच्या हटकर वस्तीवरच्या कांद्याच्या चाळीवर वीज कोसळल्याने अख्खी चाळ भस्मसात झाली. कासारी, कसाबखेडा, गंगाधरी साकोरा, कळमदरी, जामदरी अशा पट्ट्यात हा दमदार पाऊस झाला. साकोरा परिसरात पाच ते सात जणांच्या पोल्ट्री फॉर्मच्या शेडचे अतोनात नुकसान झाले.

शेडचे पत्रे उडाले व गारपिटीमुळे पोल्ट्रीफॉमधील शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात. महसुली यंत्रणा निवडणुकीच्या प्रशिक्षणात व्यस्त असल्याने पंचनाम्यांना सुरुवात झाली नव्हती. मात्र दोन दिवसात पंचनाम्याचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT