Water tanks arranged on the road here. esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : नांदगाव तालुक्याची मदार टँकरवर! 222 वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई

Water Scarcity : भूगर्भात कमी होणारी जलाशयाची पातळी एकीकडे, तर दुसरीकडे माणिकपुंजचा अपवाद वगळता अन्य लहान-मोठे जलस्रोत असलेली धरणे कोरडी पडल्याने तालुक्याची मदार आता केवळ टँकरवरच आहे.

संजीव निकम : सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Scarcity : मार्च महिन्याच्या ऐन मध्यातच उन्हाची तीव्रता, भूगर्भात कमी होणारी जलाशयाची पातळी एकीकडे, तर दुसरीकडे माणिकपुंजचा अपवाद वगळता अन्य लहान-मोठे जलस्रोत असलेली धरणे कोरडी पडल्याने तालुक्याची मदार आता केवळ टँकरवरच आहे. यंदाच्या जून अखेरीला टँकर सुरु करण्याची वेळ आली तेव्हापासून टँकरच्या मागणीत भरच पडत आहे. (nashik Nandgaon Taluka 222 Wadas habitation water shortage marathi news)

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य गहिरे बनले असून, दिवसेंदिवस टँकरद्वारे पुरवठा करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे आटलेले जलस्त्रोत, तर दुसरीकडे नळपाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक बिघाडामुळे नजीकच्या काळात पाण्यासाठी दहा दिशा फिरण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, टंचाईसदृश्य परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी प्रशासन केवळ टंचाई आराखड्यापुरते उरले आहे.

हातपंपाद्वारे दिवसातून अर्धा तासच पाणी येते. गावात टँकर येतो, हाच काय तेवढा दिलासा, असे चित्र आहे. ४७ गावे आणि २२२ वाड्या-वस्त्यांसाठी ५० टँकर सुरु असलेल्या तालुक्यातील टँकरच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता नव्याने परधाडी, बिरोळे, सावरगाव, गोंडेगाव, जवळकी, जळगाव बुद्रुक, चिंचविहीर, बाभूळवाडी या आठ गावांच्या टँकरच्या मागणीचे प्रस्ताव मंजूर झाले असून, टँकरच्या गावाची संख्या ५५ एवढी झाली आहे. (Latest Marathi News)

तर वाड्या-वस्त्यांची संख्या अडीचशेवर २५० वर पोहचली आहे. नाग्यासाक्या धरणाने तर कधीच तळ गाठलेला आहे. मात्र, तेथूनच टँकरसाठी पाणी उचलले जात होते. येथील पाणी पिण्यायोग्य नाही, अशा तक्रारी वाढू लागल्यावर टँकर भरण्यासाठी शेवटी माणिकपुंजचा आधार शोधावा लागला. परंतु, टँकरचे मिळणारे पाणी पुरत नाही म्हणून पिण्याचं पाणी विकत घेण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही.

जारच्या पाण्याचा बाजार तेजीत

थंड पाण्याच्या जारची विक्री करणारे तब्बल अडिचशेवर व्यावसायिक शहरातील विविध भागात आहे. व्यावसायिक आस्थापनांना २० ते ३० रुपयांत २० लिटर पाण्याचा जार पोहोचवण्याची सेवा दिली जात आहेत. त्यांच्यावर मात्र कोणाचेही नियंत्रण नाही.‘कूल जार’ भरून त्यांची वाहतूक करतानाचे चित्र रोज रस्त्यांवर दिसतेच. पण, यातील पाणी कोठे भरले जाते, ते कसे भरले जाते, त्याची गुणवत्ता काय, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याच्या फंदात कोणी पडत नाही. परिणामी, प्लास्टिक जारमधील पाणी सर्वांची गरज बनली आहे.

टँकर सुरु असलेली गावे

नवसारी, शास्त्रीनगर, बोयेगाव, खादगाव, धोटाणे खुर्द, लक्ष्मीनगर, भार्डी, हिसवळ खुर्द, नागापूर, पांझणदेव, माळेगाव कऱ्ह्यात, बेजगाव, वंजारवाडी, सटाणे, मल्हारवाडी, कऱ्ही, वडाळी बुद्रुक, पानेवाडी, मोहेगाव, धनेर, बाणगाव खुर्द, अस्तगाव, मांडवड, एकवई, मोरझर, बाणगाव बुद्रुक, जळगाव खुर्द, अनाकवाडे, भौरी, हिसवळ बुद्रुक, दऱ्हेल, दहेगाव, सोयगाव, खिर्डी, भालूर, टाकळी बुद्रुक, टाकळी खुर्द, साकोरा, वडाळी खुर्द, चांदोरे, पिंपरखेड, नांदूर, पिंप्राळे, क्रांतीनगर, वाखारी, लोहशिंगवे, हिंगणवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT