Minister Girish Mahajan came to take Narahari Jhirwal to the platform  esakal
नाशिक

Nashik News : मोदींच्या सभेत झिरवाळ यांचे मानापमान नाट्य

Nashik News : महायुतीच्या घटकपक्षांच्या काही नेत्यांची चलबिचल व सर्वकाही अलबेल नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान पुन्हा एकदा समोर आले.

एस. डी. आहिरे : सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : महायुतीच्या घटकपक्षांच्या काही नेत्यांची चलबिचल व सर्वकाही अलबेल नसल्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान पुन्हा एकदा समोर आले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सभेवेळी थेट उपस्थित श्रोत्यांमध्ये स्थानापन्न झाले. त्या वेळी सर्वांच्या भुवय्या उंचावल्या. त्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी संयोजकांची चांगलीच दमछाक झाली. (Nashik Narhari Zirwal)

ते मंचावर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव निवळला. पण सुमारे वीस मिनिटे झिरवाळ यांचे मानापमान नाट्य चांगलेच रंगले. महायुतीसमवेत असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे आठ दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यात एका धार्मिक सोहळ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे व नेत्यांसोबत एका व्यासपीठावर आले होते.

त्यावरून एकच खळबळ उडाली. त्यावर पडदा पडतो ना पडतो तोच आज झिरवाळ यांनी अनपेक्षित कृती केली. पिंपळगावच्या सभेत विधानसभा उपाध्यक्ष असल्याने राजकीय संकेतानुसार व्यासपीठावर त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. पण झिरवाळ हे थेट सभेसाठी उपस्थित प्रेक्षकांमध्ये येऊन स्थानापन्न झाले. (latest marathi news)

झिरवाळ हे प्रेक्षकांमध्ये बसले असल्याची कुणकूण संकटमोचक गिरीश महाजन यांना लागताच त्यांनी झिरवाळांकडे धाव घेतली. व्यासपीठावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संयोजक झिरवाळ यांना व्यासपीठावर येण्यासाठी हातवारे करीत होते. अखेर महाजन यांनी झिरवाळ यांना व्यासपीठावर घेऊन आले. लागलीच उपस्थितांशी संवाद साधण्यास सांगितले.

मला ‘घर का ना घाटका’ करून ठेवलंय : झिरवाळ

महायुतीच्या डॉ. पवार यांच्यासाठी मी प्रचार करतोय. पण एका धार्मिक सोहळ्यानिमित्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांबरोबर एकत्र आल्याने ‘मला घर का ना घाटका’ करून ठेवलंय. मी पण राजकारणातील दिग्गज नेत्यांबरोबरच अनेक वर्ष काम केलंय. आदिवासी समाजातील असून, ‘हा तरा हा अन् ना तर ना’ अशी माझी भूमिका असते. जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांच्यात बसलो होतो, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT