Dressed in a green shawl, Shri Bhagwati was decorated in a green Mahavastra on Tuesday at the scenic Saptshringgad. esakal
नाशिक

Nashik Navratri 2024 : माते सप्तशृंग भगवते, शरण तुझिया चरणे...सप्तशृंग गडावर षष्ठीस आदिमायेच्या उत्सवाला उधाण

Latest Navratri 2024 News :

सकाळ वृत्तसेवा

वणी : ‘सुंदर ते ध्यान, षष्ठीचे दिनी... श्री जगदंबे अष्टदशभुजा मूर्ते... वणीवासिनी विश्वपालनकर्ते... माते सप्तशृंग भगवते, शरण तुझिया चरणे... अर्थात, आद्यशक्तिपीठात आदिमायेच्या शारदीय नवरात्रोत्सवातील सहाव्या माळेस भाविकांच्या उत्साहास उधाण आले असून, आदिमायेच्या भेटीसाठी हजारो भाविकांनी गडावर दाखल होत दर्शन घेतले. (Navratri 2024 Celebration of Shashti at Saptshringa)

आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी सकाळी सातला देवीच्या अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचवेळी पुरोहितांच्या मंत्रघोषात देवीच्या उत्सवमूर्तीवर पंचामृत महापूजेस सुरुवात करण्यात आली. पंचामृत महापूजा दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे व सप्तशृंगगडचे सरपंच रमेश पवार यांनी कुटुंबीयांबरोबर केली.

पहिल्या माळेपासूनच भाविकांचा सुरू झालेला ओघ आजच्या सहाव्या माळेलाही वाढता दिसून आला. देवीभक्तांमधील उत्साहामुळे गडावर चैतन्याचे वातावरण असून, बुधवारी (ता. ९) सप्तमी हा नवरात्रोत्सव उत्साहातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानला जात आहे. या दिवशी जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, अहमदनगर व गुजरातमधील हजारो भाविक पदयात्रेने सप्तमीच्या पूर्वसंध्येस गडावर दाखल झाले.

हजारो भाविक सप्तशृंगगडाकडे आई भगवतीचा जयघोष करीत मार्गक्रमण करीत आहेत. यात महिला भाविकांचा मोठा सहभाग असून, वणी-नाशिक रस्ता पदयात्रेकरूंच्या गर्दीने फुलला आहे. त्यामुळे बुधवारी गडावर उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणा, ट्रस्ट, ग्रामपंचायत, राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे. (latest marathi news)

सहाव्या रूपाची पूजा

शारदीय नवरात्रीत ललिता पंचमीनंतर दुर्गा देवीच्या सहाव्या रूपाची पूजा केली जाते. यानंतर सरस्वती पूजनाची तयारी केली जाते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी दुर्गा देवीचे सहावे रूप कात्यायनी देवीची पूजा केली जाते. देवी कात्यायनीची पूजा केल्याने धन, धर्म, काम आणि मोक्ष प्राप्त होतो. तसेच, या देवीला महिषासुरमर्दिनी या नावानेही ओळखले जाते. देवीला लाल फुले आणि लाल वस्त्र अर्पण केले जाते. तसेच, मधापासून बनवलेली मिठाई अर्पण केली जाते.

स्तोत्र

निशुम्भशुम्भनिर्नाशि त्रिलोक्यशुभदे नमः..!

रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि.. !!

शुंभ आणि निशुंभ राक्षसांचा संहार करणारी, स्वर्ग, पृथ्वी व पाताळ या तीन लोकांचे कल्याण करणारी हे देवी, तू मला रूप दे, विजय दे, यश दे, आणि तू माझ्यावर कृपा कर, माझ्या शत्रूंचा नाश कर..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT