Bombay High Court Justice Nitin Sambare present during Panchamrit Mahapuja of Adimaya on Saturday esakal
नाशिक

Navratri 2024 : ब्रह्मा, विष्णू आणि महेश देवांच्या शक्तींची देवता! तिसऱ्या माळेस सप्तशृंगगडावर आदिमायेच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

Latest Navratri 2024 News : सप्तशृंगीमाता शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेस शनिवारी (ता. ५) सुमारे ३५ हजार भाविकांनी सप्तशृंगगडावर आदिमाता सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले.

सकाळ वृत्तसेवा

वणी : आदिशक्ती, दुर्गा, चंडिका, तीच आदिमाया... शक्तिरूपधारिणी, महिषासुरमर्दिनी, सांभाळते भक्तांना, अनंत रूपे घेउनी... अर्थात, आदिशक्ती सप्तशृंगीमाता शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेस शनिवारी (ता. ५) सुमारे ३५ हजार भाविकांनी सप्तशृंगगडावर आदिमाता सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. (Navratri 2024 lot of people gather at Saptshringagad)

धर्मग्रंथानुसार देवी चंद्रघंटाने राक्षसांचा नाश करण्यासाठी अवतार घेतला होता. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या शक्तींचा समावेश होतो. देशभरातील ५१ शक्तिपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवातील तिसऱ्या माळेची भगवतीची पंचामृत महापूजा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते सपत्नीक झाली.

विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ, विश्वस्त तथा तहसीलदार रोहिदास वारुळे, ललित निकम, मुख्यव्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षाप्रमुख यशवंत देशमुख आदींसह भाविक उपस्थित होते.

शनिवारी दुपारनंतर गडावर भाविकांच्या गर्दीत वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवारी (ता. ६) चौथी माळ व रविवारची सुटी असल्याने भाविकांच्या गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. घटस्थापनेनंतर महिला भाविक दर्शनासाठी घराबाहेर पडल्या असून, महिला भाविक मंदिर व परिसरात सप्तशतीचे पठण करीत असल्याचे दिसत होते.

पायरीमार्गे जाणारे भाविक पायऱ्या चढत चढत ‘आई सप्तशृंगी’चा जयघोष करत मोठ्या उत्साहात न थकता मंदिराच्या पायऱ्या सहजतेने चढून जात होते. या वेळी येणाऱ्या भाविकांना आई सप्तशृंगीचे तेजोमय स्वरूप, सजावट पाहण्याची ओढ लागली होती. (latest marathi news)

तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा

सप्तशृंगी देवीच्या तिसऱ्या शक्तीचे नाव ‘चंद्रघंटा’ आहे. देवी चंद्रघंटाचे रूप परम शांतिपूर्ण आणि परोपकारी आहे. नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवीचे तिसरे रूप असलेल्या देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. देवी चंद्रघंटाची पूजाअर्चा केल्याने आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते, असे म्हटले जाते. धार्मिक शास्त्रानुसार नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी जो कोणी देवीचे तिसरे रूप असलेल्या चंद्रघंटाची पूजा करतो, त्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पिण्डज प्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता ।

प्रसादं तनुते मह्यम् चन्द्रघण्टेति विश्वुता ॥

पिंडजा प्रवरारुधा चंडकोपस्त्रकैर्युता ।

प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्तेति विश्रुता ॥

अर्थ : वाघावर आरूढ झालेल्या आणि प्राणघातक शस्त्रे धारण केलेल्या देवी चंद्रघंटाला मी प्रणाम करतो, तिच्या कृपेने मला आलिंगन दे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT