Navratri Police Protection esakal
नाशिक

Nashik Navratri Festival 2024: नवरात्रोत्सवासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त! आवाजाची मर्यादा ओलांडल्यास होणार पोलीस कारवाई

Latest Navratri Festival 2024 News : आयुक्तालय हद्दीतील दोन परिमंडळांतर्गत सुमारे २०० पेक्षा अधिक गरबा-दांडिया आयोजकांसह मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु परवानगी देताना आवाजाच्या मर्यादेचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Navratri Festival 2024 : नवरात्रोत्सवाला उद्यापासून (ता. ३) प्रारंभ होत असून, तरुणाई गरबा-दांडियासाठी आतुर झाली आहे. मात्र, या दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

तसेच, आयुक्तालय हद्दीतील दोन परिमंडळांतर्गत सुमारे २०० पेक्षा अधिक गरबा-दांडिया आयोजकांसह मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु परवानगी देताना आवाजाच्या मर्यादेचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. (Navratri Festival 2024 Strict police presence in city)

शहराची कुलदेवता कालिका देवी मंदिर यात्रोत्सव आणि भगूर येथील रेणुका देवी मंदिर यात्रोत्सवाला घटस्थापनेपासून प्रारंभ होतो. नवरात्रोत्सवामध्ये शहरात ठिकठिकाणी बंदिस्त ठिकाणी गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. तर, मंडळांकडून खुले मैदानात दांडियाचे नियोजन केले जाते.

देवी मंदिरांमध्येही या काळात भाविकांची गर्दी होत असते. कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी पहाटे चार वाजेपासून ते मध्यरात्रीपर्यंत भाविकांची गर्दी असते. उपनगरांमधून महिला भाविक पायी मंदिरात दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यांसह निर्भया, दामिनी व गोपनीय विभागाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्याही सूचना केल्या आहेत. या काळात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेण्याचे प्रकार घडत असतात. यास आळा बसावा यासाठी मंदिर परिसरांमध्ये पोलीस गस्त तैनात असणार आहे. तसेच महिलांनीही घराबाहेर वा गर्दीच्या ठिकाणी जाताना मौल्यवान वस्तू परिधान न करण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. (latest marathi news)

पोलिस उपायुक्तांकडून पाहणी

पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी कालिका मंदिर यात्रोत्सवानिमित्ताने मंदिरा परिसरातील नियोजनाची पाहणी केली. मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दर्शन रांगेच्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.

तसेच, मंदिरा परिसरासह यात्रा मार्गावरही ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावेळी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे, कालिका मंदिर देवस्थानचे केशव पाटील, दत्ता पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT