Barricading at the NCP office at Mumbai Naka. esakal
नाशिक

Nashik NCP Bhavan: राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयास बॅरिकेडिंगचा वेढा!

सकाळ वृत्तसेवा

Nashik NCP Bhavan : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून पक्ष, चिन्ह आणि कार्यालयांवर आपला हक्क सांगितला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयास बॅरिकेडिंगचा वेढा करण्यात आला आहे. त्याकडे बघून नेमका प्रवेश कुणास, असा प्रश्न नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. (Nashik NCP Bhavan office surrounded by barricading political)

राजकारणात काही दिवसांपूर्वी दुसरा मोठा भूकंप होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार अशा दोन गटांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला आहे. सर्व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

अशात दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्ष, चिन्ह आणि कार्यालयांवर आपला दावा सांगितला जात आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील राष्ट्रवादी भवनाचा ताबा दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला होता.

दोन्ही गट एकमेकांच्या समोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. या वेळी गटातील प्रत्येक जण आपल्याच गटाचा दावा कार्यालयावर सांगत होता. तणाव वाढत असल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत पदाधिकाऱ्यांची समजूत काढली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुढेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यानिमित्ताने भवनाबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. कार्यालयाच्या दर्शनी भागात संपूर्ण बॅरिकेडिंग लावण्यात आल्याने जणू कार्यालयास बॅरिकेडिंगचा वेढा पडला आहे, असे दिसून येत आहे.

सध्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचीही गर्दी कमी झाल्याने कार्यालयाचे प्रवेशद्वारही बंद दिसून येत आहे.

लावलेले बॅरिकेडिंग पाहून सामान्य नागरिक आणि दोन्ही गटांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे, की नेमके हे बॅरिकेडिंग कुणासाठी आहे. कुणास आत प्रवेश नाही, की अन्य कुठले कारण आहे.

तर काहींना कारण कुठलीही असू देत, कार्यालयास असलेला बॅरिकेडिंगचा वेढा पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा ठरत आहे.

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून गजबजून जाणाऱ्या कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट पसरला आहे. कार्यालयबाहेरची बॅरिकेडिंग आणखी त्यात भर टाकत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT