Ranjan Thackeray esakal
नाशिक

Nashik NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे

जिल्हाध्यक्षपदी ॲड. रवींद्र पगार व प्रेरणा बलकवडे

सकाळ वृत्तसेवा

Nashik NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे आणि जिल्हाध्यक्षपदी ॲड. रवींद्र पगार आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच जिल्हा कार्याध्यक्षपदी विष्णूपंत म्हैसधुणे व गोरख बोडके यांची, तर सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बाळासाहेब कर्डक यांची आणि यांची नियुक्ती झाली. (Nashik NCP News Ranjan Thackeray city president)

मुंबईतील कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न-नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार शिवराम झोले, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, निवृत्ती अरिंगळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर श्री. ठाकरे, श्री. पगार, सौ. बलकवडे, श्री. म्हैसधुणे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा पूर्वीची पदे देण्यात आली आहेत.

श्री. म्हैसधुणे यांच्यावर सिन्नर व देवळाली विधानसभा मतदारसंघाची, तर श्री. बोडके यांच्यावर इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, पेठ व सुरगाणा तालुक्याची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT