Nashik Division Head Post Office GPO esakal
नाशिक

Nashik News : GPO कार्यालयाचे 8 ते 8 काम सुरू; या प्रकारे होईल काम...

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : जीपीओ टपाल कार्यालयाच्या वेळेत मंगळवार (ता. १०) पासून बदल करण्यात आला आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वेळेत काम चालणार आहे. नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तीन शिफ्टमध्ये काम होणार असल्याने कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे आठच तास काम करता येणार आहे.

कामाचे तास वाढल्याने कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा ताण लक्षात घेता वाढवण्यात आलेल्या बारा तासाच्या कामाचे तीन शिफ्टमध्ये विभाजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी ४, सकाळी १० ते सायंकाळी ६ तसेच दुपारी ४ ते रात्री ८ अशी कर्मचाऱ्यांसाठी कामाची वेळ असणार आहे.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

यात सकाळी ८ ते रात्री ७ नागरिकांच्या विविध कामांसाठी कार्यालय असेल, तर पुढील १ तास अर्थात ७ ते ८ वाजेपर्यंत कार्यालयीन कामाची वेळ असणार आहे. अशा प्रकारचे नियोजनामुळे नागरिकांना कामासाठी जास्त वेळ मिळेल. शिवाय कर्मचाऱ्यांनाही शासकीय वेळेनुसारच आठ तासाचे काम करण्यास मिळेल. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडणार नाही. या वेळेमुळे नागरिक आणि कर्मचारी दोघांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

मंगळवारपासून कार्यालयाची नवीन वेळ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तांत्रिक कारणामुळे विभागाचे सर्व्हर डाऊन झाल्याने आर्थिक कामांना अडचण आली. दिवसभर सर्व्हर डाऊनमुळे दिवसभर कुठल्याही प्रकारची आर्थिक कामे होऊ शकली नाही. इतर विविध कामांना मात्र वेग आल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT