Crime News esakal
नाशिक

Nashik News : मालेगावात आढळले 2 बांगलादेशी नागरिक; बनावट कागपत्रांद्वारे केला भारतात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : मालेगाव शहरातील रहिवासी असल्याचे भासविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून भारतात बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आलम आमीन अन्सारी (रा. हजारखोली) व ताहीर अली युसूफ अली (रा. शाही गोल्डन हॉटेलच्या पाठीमागे) या दोघा बांगलादेशी नागरिकांना येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. डी. कुरुलकर यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व दोघांना दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आठ दिवस अधिक सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

ताहीर अली युसूफ अली (रा. गोल्डननगर) व आलम आमीन अन्सारी (दोघे रा. नैकुलसूरी, जि. बांदरबन, बांगलादेश, हल्ली रा. हजारखोली, मालेगाव) हे दोघेही १ ऑक्टोबर २०२० ते ६ नोव्हेंबर २०२० पर्यंत शहरात राहत होते. त्यांनी इतरांच्या मदतीने खोटा जन्मदाखला तयार करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्या. आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते पासबुक, रेशन कार्ड व इतर बनावट कागदपत्रे तयार करून ती खरे असल्याचे दाखविले. मालेगाव शहरातील रहिवासी असल्याचे भासवून पासपोर्ट तयार केला.

बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती लपवून ठेवली. दोघांसह इतर दहा जणांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आलम अन्सारी याच्यासह अकरा जणांविरुद्ध आयेशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही खटल्याचे कामकाज नुकतेच न्यायालयात चालले. दरम्यानच्या काळात खटल्याचे कामकाज सुरू असताना दोघांनी न्यायालयापुढे बांगलादेशी नागरिक असल्याचे व बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याचे कबूल केले होते.

अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट संजय सोनवणे यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने दोघांना वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. इतर संशयित आरोपींबाबतचा खटला प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॉकपिटमध्ये चाकू हल्ला, विमान वेगाने खाली आलं... तरी १७४ जणांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार कोण? साहस पाहून नेतान्याहू, ट्रम्पही शॉक

LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Nuchinunde Recipe: इडली-वडा तर नेहमीच खाता; ट्राय करा कर्नाटकचं स्पेशल, प्रोटीनने भरपूर 'नुचिनुंडे'!

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

SCROLL FOR NEXT