Road Development Sakal
नाशिक

Nashik News : पंतप्रधान ग्रामसडकमधून जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ५० कोटी; या गावांतील रस्त्यांचा होणार विकास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास आणि रस्त्यांच्या मजबुतीसाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांतून पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत ५० कोटींच्या कामांना मंजूर मिळाली आहे. या निधीतून सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या चार तालुक्यातील तेरा महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास आणि मजबुतीकरण होणार आहे.

केंद्राच्या आणि राज्याच्या मंत्रालयात जाऊन अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेत निधीसाठी साकडे घातले होते. त्यांच्या सततच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. शासनाने पंतप्रधान ग्राम सडक योजना २०२२-२३ अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. यामध्ये नाशिक, सिन्नर, इगतपुरी आणि त्रंबकेश्वर या चार तालुक्यांमधील रस्त्यांचे मजबुतीकरण केले जाणार आहे.

त्रंबकेश्वर तालुक्यातील कोटंबी -हाणपाडा रस्त्याच्या मजबुती करणासाठी दोन कोटी बहात्तर लाख, मेटघर किल्ला ते दुगारवाडी रस्त्याच्या कामासाठी चार कोटी २५ लाख , बोरीपाडा रायते रस्त्याच्या कामासाठी चार कोटी ३९ लाख, नाशिक तालुक्यातील जलालपूर -महादेव रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी २१ लाख, पळसे ते शेवगेदारणा रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी ७३ लाख.

जाखोरी ते जोगलटेंभी रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी ५५ लाख, सारूळ ते राजुरबहूला रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी ५१ लाख, सिन्नर तालुक्यातील शास्त्रीनगर ते वडगाव या दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी ६५ लाख, ब्राह्मणवाडी ते वडझिरे या दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी ८४ लाख, गोंदे फाटा ते मुसळगाव -बारागाव पिंपरी रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी ६५ लाख तर इगतपुरी तालुक्यातील राष्ट्रीयमार्ग -१२ ते वाघोबाची वाडी या दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी ९८ लाख.

नांदडतगाव -सांजेगाव ते शिरसाठे या दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी ६१ लाख, टाके घोटी ते ट्रिंगलवाडी या दरम्यानच्या साडेसात किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी ९१ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने आतापर्यंत किती रुपये खर्च केले? या पैशातून करता आली असती 'ही' मोठी कामे

LPG Alternative : LPG च्या टेन्शनपासून होणार सुटका ! आता एका क्लिकवर मिळणार PNG कनेक्शन, गॅसचा खर्चही होणार कमी, काय आहे सरकारची योजना?

Kolhapur Rape Case : ओळखपत्र करून देण्याचा बहाणा, तरुणीवर सामूहिक वारंवार अत्याचार; फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी, पोलिसांनी मोबाईल घेतला अन्

Latest Marathi News Live Update : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, अनेक सखल भागांत पाणी साचले

Shirol Tehsildar protest : शिरोळ तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडले, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आंदोलक संतप्त

SCROLL FOR NEXT