Death News esakal
नाशिक

Nashik News : घरगुती प्रसूती बेतली जिवावर; प्रसूती पश्‍चात महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहराजवळील म्हाळदे शिवारात घरगुती प्रसूती करण्याचा महिलेच्या कुटुंबीयांचा प्रयत्न या महिलेच्या जिवावर बेतला. ज्योती संतोष वाघ (वय २८, रा. म्हाळदे) या महिलेची रविवारी (ता.४) दुपारी दोनच्या सुमारास घरी प्रसूती झाली.

बाळंत झाल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे तिला चक्कर येऊ लागली. अत्यवस्थ स्थितीत तिला पती संतोष वाघ याने सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथील डॉ. सुमैय्या अन्सारी यांनी तपासून तिला मृत घोषित केले. पोलिस नाईक सचिन अहिरे यांच्या माहितीवरून पवारवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

महापालिका रुग्णालयांसह सामान्य रुग्णालयातही मोफत प्रसूती सुविधा असताना घरगुती प्रसूती करणे या महिलेच्या जिवावर बेतले. ही बाब लक्षात घेता शहरातील महिलांनी आरोग्यसुविधेचा लाभ घेतला पाहिजे. महिलांनी प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात काळजी घेणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT