Sandeep Karnik, Commissioner of Police, Nashik. esakal
नाशिक

Nashik News : रिल्सचा भाई ‘बकासुरा’ला पोलिस आयुक्तांचा दणका

Nashik News : एका सोशल मीडियावरून भाईगिरी करणार्या बकासुराला पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चांगलाच दणका दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सोशल मीडियावर ( Social Media ) दररोज रिल्सचा जणू पाऊसच पडत असतो. परंतु काही या रिल्सच्या माध्यमातून भाईगिरी करण्याचा प्रयत्न करतात. अशा एका सोशल मीडियावरून भाईगिरी करणार्या बकासुराला पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चांगलाच दणका दिला आहे. या रिल्स भाईला जेव्हा पोलिसांच्या दांडुक्याचा प्रसाद मिळाला, तेव्हा त्याच्यावरील भाईगिरीचे भूतच उतरले. (Bakasur slapped by Police )

एवढेच नव्हे तर त्याने आपल्या प्रोफाईलवरून भाईगिरी न करण्याचा माफीनामाच दिला आहे. अलिकडे सोशल मीडियावर खूप मोठ्याप्रमाणामध्ये रिल्स बनवून व्हायरल केले जातात. रिल्सचे तरुणाईमध्ये चांगलेच आकर्षणही आहे. मात्र असे असले तरी काही तरुणांमध्ये रिल्सच्या माध्यमातून भाईगिरी करण्याचा नाद जडला आहे.

भाईगिरी करणारे फोटो आणि फिल्मी डायलॉग म्हणत फोटो, रिल्स करून सोशल मीडियावर अपलोड केले जातात. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम या हॅण्डलवर ‘बकासुर’ नावाचे नाशिकमधील एका तरुणाचे प्रोफाईल आहे. त्यावर या बकासुराने भाईगिरी करणारे रिल्स बनविले होते. तसेच त्यावर भाईगिरी स्टाईलमध्ये कमेंटही होते.

‘रावण कभी मरता नही...’ अशाप्रकारचे डायलॉगबाजी त्याच्या हॅण्डलवर होते. सदरची बाब नाशिक सायबर पोलीसांच्या सर्चिंगमध्ये येताच, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या बकासुराला पोलिसांनी शोधून काढले आणि पोलिस कारवाई करीत दंडुक्याचा प्रसाद मिळताच त्याचे भाईगिरीचे भूत उतरले.

त्याच्याच प्रोफाईलवरून ‘माफीनामा’ व्हायरल करताना त्याने भाईगिरी करणारे रिल्स कोणीही व्हायरल करू नये असे आवाहन करणारा त्या बकासुराचा रिल्स आता पोलिसांनीच सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

''सोशल मीडियावरून कोणीही भाईगिरीचा प्रयत्न करू नये. कोणी तसा प्रयत्न केला, रिल्स व्हायरल केले तर पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल.''-संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT