Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj esakal
नाशिक

Shiv Jayanti शिवविचारात सर्वांना तारण्याची क्षमता, आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिवचरित्राचे कसे करावे अनुकरण ?

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज एक शूर आणि यशस्वी राजा म्हणून माहीत आहेत. पण त्यांच्या या यशामागे त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या या कौशल्याबाबत इतिहासात फार काही लिहिण्यात आलेले नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू आपल्याला समजून घ्यावा लागतो, तो शिवरायांच्या कृतीतून, त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून, त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांमधून व लढलेल्या लढायांमधून... शिवरायांची संपूर्ण कारकीर्द बघितली, तर आपल्या असे लक्षात येईल, की आदर्श राज्यकारभार कसा असला पाहिजे. (article by Adv Nitin Thackeray ability to save all in Shiv Vichar )

आज इतक्या वर्षांनंतरही समाजामधील विविध समस्या सोडविण्यासाठी अथवा सुराज्यासाठी प्रत्येकाने शिवविचारच अंगीकारणे ही काळाची गरज आहे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य व्यवस्थापन केले. त्यांचे नेतृत्व, संघटनकौशल्य, युद्धनीती, गनिमी कावा कौशल्यपूर्ण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे उभे आयुष्य हा एक फार मोठा विषय आहे.

त्यांच्या नेतृत्वात दळणवळणाचे व्यवस्थापन, स्वराज्य विस्तार करतानाचे नियोजन, रसद पुरविण्याचे तंत्रज्ञान, नियुक्त केलेले मंत्रिमंडळ, सैन्यदलाची उभारणी या अनेक पैलूंतून त्यांचे व्यवस्थापन कौशल्य बघायला मिळते आणि म्हणूनच ते आधुनिक व्यवस्थापनाचे गुरू आहेत, याची आपल्याला निश्चितच खात्री पटते.

वाखाणण्याजोगी जलनीती

असे एकही क्षेत्र नाही की ज्यामध्ये महाराजांचे योगदान नाही. महाराजांची जलनीतीसुद्धा वाखाणण्याजोगी आहे. स्वराज्य संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यांमध्ये मुबलक पाण्याचा साठा असणे महत्त्वाचे होते. त्यामुळे साधारणपणे वर्षभर पुरेल, अशी उपाययोजना महाराजांनी केली. चुकून गडावर हल्ला झाला, तरी आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा गडावर आवश्यक तेवढा पाणीसाठा कसा राहील, याची त्यांनी काळजी घेतली.

पाथरवट लोकांच्या मदतीने जलभेद्य खडकांचे थर आणि पाझरणारे खडक यांच्या मदतीने किल्ल्यात पाणीसाठा करता येऊ शकतो, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या पाथरवटांकडून महाराजांनी किल्ल्यातच खाणी किंवा हौद दगडांच्या उतारावर खोल खड्डे तयार करून, त्यात सतत पाणी पाझरत राहील, याची व्यवस्था करून घेतली.

आव्हाने स्वीकारली

आजूबाजूला इतके प्रबळ शत्रू असतानाही स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न पाहणे तसे धाडसाचेच होते. पण त्यांनी अचूक नियोजन करत हळूहळू स्वराज्याच्या निर्मितीकडे वाटचाल केली. समाजातील सर्व स्तरांतील लोकांना सामावून घेतले. संसाधने जमविली, नवीन किल्ले बांधले, जुने किल्ले बळकट केले.

प्रसंगी आरमार निर्मितीसाठी पोर्तुगीजांची मदत घेतली व इंग्रजांच्या वेगळ्या चलनाच्या मागणीला फेटाळून लावले. या सर्वांच्या बळावरच ध्येयापर्यंत पोचण्याच्या वाटचालीला अनिश्चितता माहीत असूनही त्यांनी आव्हानाला सामोरे जात स्वराज्य प्रत्यक्षात उतरविले.

लवचिकता हा महत्त्वाचा पैलू

लवचिकता त्यांच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा पैलू होता. त्यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक मोहीम शिस्तबद्ध असायची. स्वराज्य वाचविण्यासाठी काही प्रसंगी त्यांनी दोन पावले माघार घेतली. लवचिकता त्यांच्या नेतृत्वात होती. काही प्रसंगी रयतेचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून मुघलांशी तह केला. तहातील अटी-शर्तीनुसार मुघलांना २३ किल्ले परत दिले. त्या वेळी स्वराज्यावर आलेले मोठे संकट टाळले. कालांतराने पुन्हा त्यांनी ते सर्व किल्ले मुघलांकडून जिंकून घेतले.

गुंतवणुकीला महत्त्व

एखाद्या मोहिमेतून आर्थिक फायदा झाला की लगेच गुंतवणूक करत नवीन किल्ले बांधले. तिथल्या आजूबाजूच्या परिसराचा विकास करणे, मुलखाचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून तेथे पायाभूत सुविधा उभारणे, इतर पूरक व्यवसायांना चालना देणे यात ते गुंतवणूक करत असत.

बदल्यांची पद्धत शिवचरित्रात

शासकीय व्यवस्थेमध्ये आज अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या होतात, त्याचा कालावधीसुद्धा शिवचरित्रात आहे. महाराजांच्या कारकीर्दीत दर तीन-चार व पाच वर्षांनी विविध पदांवर नोकरी करणाऱ्यांची बदली होत असे. त्यामुळे भ्रष्टाचार व गैरकृत्यांना आळा बसत असावा, असे काही इतिहास अभ्यासक सांगतात.

महाराजांच्या कारकीर्दीची खरी प्रेरणा राजमाता जिजाऊ होय. त्यांनी शिवरायांना घडविले, वाढविले व स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहितही केले. महाराज जेव्हा आग्र्याला गेले व तेथे कैद झाल्यानंतर अनेक महिन्यांचा कालावधी उलटला. त्यादरम्यान महाराजांबद्दल कोणालाच माहिती नव्हती.

पण इतक्या महिन्यांच्या कालावधीतही जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली महाराजांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी स्वराज्याची घडी विस्कटू दिली नाही. महाराजांच्या अनुपस्थितीतही स्वराज्याचा गाडा नेहमीप्रमाणे सुरू राहिला. कारण शिवरायांनी असे विश्वासू सहकारी निवडले आणि ते घडविलेही.

स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक

रायगड किल्ला ही स्वराज्याची केवळ राजधानीच नव्हती तर ती त्याही काळात बांधण्यात आलेले एक सुनियोजित असे छोटेसे शहर म्हणता येईल. आजच्या काळातही स्मार्टसिटीपेक्षाही चांगल्या पद्धतीचे नियोजन रायगडावर केलेले आपल्याला दिसते. तेथील बाजारपेठ असणारी घरेही दुमजली व तीनमजली होती.

रायगडावर बाजारपेठेतील दुकाने इतकी अचूक बांधली होती, की विक्रेता व ग्राहक या दोघांनाही वस्तूंची देवाणघेवाण करताना अजिबात त्रास होणार नाही. यामधून त्यांच्यातला स्थापत्यशास्त्राचा अभ्यासक हा गुण आपल्या लक्षात येतो.

बलशाली समाजासाठी शिवचरित्र

महाराजांनी त्यांच्या माणसांवर प्रेम केले, त्यांना माया लावली. त्यामुळे त्यांनी स्वराज्यातील लोकांचे मन जिंकले. लोक अक्षरशः त्यांची पूजा करत असत. त्यांनी प्रत्येकाला स्वराज्य मिळविण्यासाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली. अनेकदा युद्धात स्वतः रणभूमीवर उतरून त्यांनी नेतृत्व केले.

जे त्यांनी ठरविले ते त्यांनी करून दाखविले. जेव्हा सहकारी आपल्या नेत्याला स्वतः झोकून देऊन काम करताना बघतात, तेव्हा त्यांच्या मनातसुद्धा काम करण्याची प्रेरणा निर्माण होते. बलशाली समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी शिवचरित्रातच अनुकरण करावे, तरच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT