suspended Sakal
नाशिक

Nashik News : शौचालय नसल्याने सदस्यांना गमवावे लागले पद; खोटी माहिती देणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा

येवला : स्वच्छतेसाठी शौचालय वापरण्याची शक्ती शासन करत आहे. याच्यासाठी काही निकषही लावले असून ते न पाळल्यास काय अद्दल घडते याचा अनुभव धामोडे (ता.येवला) ग्रामपंचायतीचे सदस्य साहेबराव कांबळे आणि संदीप मोरे या ग्रामपंचायत सदस्य यांना आला आहे. हे दोघे शौचालय वापरत नसल्याचे सिद्ध झाल्याने मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे यांनी दोघांना अपात्र ठरवले आहे.


श्री.कांबळे व श्री. मोरे यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रात शौचालय बाबत स्वयंघोषणा पत्रात खोटी माहिती सादर केल्याची तक्रार धामोडे येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे यांनी दाखल केली होती. ग्रामपंचायत अधिनियमानुसार उमेदवारी अर्जासोबत शौचालयाचे स्वयंघोषणापत्र करावे लागते. या दोघांनी घोषणा पत्रात शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्याची व वापर करीत असल्याचे हमीपत्र दिले होते. तसेच कुटुंबासह आपण त्याचा वापर करीत असल्याचेही स्वयंघोषणा पत्रात नमूद केले होते. मात्र यात तथ्य नसल्याचे तक्रार करून बाबासाहेब कांबळे यांनी करत ते शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.


या संदर्भात मोरे व कांबळे या सदस्यांचे म्हणणे देखील ऐकून घेण्यात आले होते. या दोघांनीही आम्ही शौचालय वापरत असल्याचे सांगून निवडणुकीच्या पराभवाचा राग धरून आमच्या विरोधात तक्रार झाल्याचे म्हटले होते. ग्रामसेवकाने देखील त्यांच्याकडे शौचालय असल्याचे अहवालात नमूद केले होते. मात्र यासंदर्भात गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या अहवालानुसार हे दोघेही शौचालय नसून वापरत नसल्याचेही सिद्ध झाले आहे.
विशेष म्हणजे ग्रामसेवकाने दिलेला अहवाल व गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात विरोधाभास असल्याचेही याप्रकरणी निदर्शनास आले. पण गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल विचारात घेऊन कांबळे व मोरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली.
First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशाने हे प्रकरण मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे यांच्याकडे पुढील सुनावणीसाठी वर्ग करण्यात आले होते. त्यानुसार प्रस्तुत प्रकरणात पुन्हा सुनावणी घेऊन व चौकशी करून दोन ग्रामपंचायत सदस्यांना उर्वरित कालावधी करिता अपात्र केले आहे असा आदेश काढला आहे. सदस्य पद गमावण्याची ही तालुक्यातील सलग पाचवी घटना आहे. या घटनेने इतर सदस्याचे धाबे दणाणले आहे. दरम्यान,तालुक्यातील आणखी काही प्रकरणे प्रलंबित असून येत्या काही दिवसात आणखी काही ग्रामपंचायत सदस्य याच्या पदावर टांगती तलवार असणार असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Latest Marathi Update Live: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, दोन जखमी, दोन ठार

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

SCROLL FOR NEXT