Nashik News
Nashik News esakal
नाशिक

Nashik News: वीजेअभावी मुल्हेर किल्ला परिसर अंधारात; ग्रामस्थ विद्यार्थ्यांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

अंतापूर : बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक मुल्हेर किल्ला व किल्ल्याखाली आदिवासी वस्ती असून येथील ग्रामस्थ, विद्यार्थी यांना विजेअभावी अंधारात राहण्याची वेळ आली आहे. वस्तीसाठी स्वतंत्र रोहित्र असूनही प्रशासनाच्या चालढकलमुळे येथील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे.

संबंधित विभागाने तातडीने तांत्रिक दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी सरपंच निंबा भानसे, उपसरपंच योगेश सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या बागलाण तालुक्यातील भूमीत ऐतिहासिक मुल्हेर किल्ला किल्ल्यावर भगवान सोमेश्वर,किल्ल्यावर शेकडो वर्षांपूर्वीचे गणपती, दुर्गामाता, हनुमान यांची मंदिरे आहे.

तसेच पाण्याची टाके, शिवप्रसाद व रामप्रसाद तोफा श्री दिगंबर अनि आखाडाचे महंत श्री १०८ सुदामादास महाराज यांचा आश्रम, सभामंडप आहे. यामुळे येथे नियमित भाविक, पर्यटक हे येत असतात. किल्ल्याच्या पायथ्याशी आदिवासी समाजाची वस्ती आहे.

यामुळे येथील किल्ला परिसरातील ग्रामस्थ, पर्यटक, विद्यार्थी यांची विजेअभावी गैरसोय होऊ नये म्हणून महावितरण कंपनीकडून लाखो रुपये खर्च करून सोमेश्वर मंदिर, आश्रम व खालील आदिवासी वस्तीपर्यंत वीजेचे कनेक्शन पुरविण्यात आलेले आहे. यासाठी स्वतंत्र रोहित्र देखील आहे.

मात्र वीजवितरणाची व्यवस्था असताना नागरिकांना अंधारात रात्र काढण्याची वेळ आलेली आहे. वीजपुरवठा व्हावा म्हणून अर्ज करूनही संबंधित विभागाच्या कारभारामुळे अद्यापही येथे वीजपुरवठा झालेला नाही.

सहकार अधिकारी वसंत गवळी यांनी आदिवासी वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी कूपनलिका करून दिली. पण वीज नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

संबंधित विभागाने या गंभीर समस्येची दखल घेऊन वीजपुरवठा तातडीने सुरळीत सुरू करून गैरसोय टाळावी अशी मागणी उत्तम सोनवणे, आनंदा पवार, बंडू पवार, छोटू पवार, नाना पवार, सहाधू सोनवणे, जाईबाई पवार, भुराबाई पवार, त्रंबक सोनवणे, सरलाबाई सोनवणे यांनी केली आहे. याबाबात आमदार दिलीप बोरसे, भाजप पदाधिकारी बिंदू शर्मा यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.

''किल्ला परिसरात हिंस्र प्राणी असल्याने रात्री वीज नसल्याने जीव मुठीत धरून रहावे लागते. पिण्याचे पाणी गैरसोय व आता परीक्षेचा काळ असल्याने घरात लाइट नसल्याने अभ्यासाला अडचण येत आहे.'' - लक्ष्मण पवार विद्यार्थी

''मुल्हेर किल्ल्यावर भगवान सोमेश्वर , गणपती मंदिर, मारुती, भडंगनाथ महाराज यांचे समाधी अत्यंत जागृत देवस्थान असल्याने दैनंदिन मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी व वर्षभर काही उत्सव होत असतात. संबंधित विभागाने तत्काळ विजेची समस्या सोडवावी.'' - दत्ता तिवारी, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT