Deceased Chirag Vinodrai Varaiya esakal
नाशिक

Nashik News : मुंबईच्या Chartered Accountantची इगतपुरी Hotel मध्ये आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : तालुक्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटंटने आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नसून या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिराग विनोदराय वरैया (वय अंदाजे ४५, रा. मुलुंड, मुंबई) असे आत्महत्या करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटचे नाव आहे. (Nashik News Mumbai Chartered Accountant commits suicide in Igatpuri Hotel Nashik News)

येथील मुंबई -नाशिक महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये चार्टर्ड अकाउंटंट चिराग विनोदराय वरैया रविवारी (ता. २९) मुक्कामी होते. सोमवारी सकाळी १० वाजले तरी ते बाहेर न आल्याने हॉटेल मॅनेजर आनंद शिंदे यांना शंका आल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत रूमचा दरवाजा तोडला असता, वरैया यांनी पूजेला लागणारे सोवळे फॅनला बांधून गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

विच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. इगतपुरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चिराग विनोदराय वरैया हे हॉटेलमालकाचे मित्र असल्याची चर्चा असून, ते हॉटेलच्या हिशेबाचे काम पाहात होते. पोलिस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक आर. एस. जाधव, हवालदार एस. एस. लोहोरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT