Auction esakal
नाशिक

Nashik News : रेणुकादेवी सूतगिरणीची मालमत्ता विक्रीला; जिल्हा बॅंकेचा दणका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने थकबाकी वसुलीसाठी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, जप्त केलेली मालमत्ता विक्री करण्यास सुरूवात केली आहे. तब्बल ३० कोटींच्या थकीत कर्जापोटी मालेगाव येथील रेणुकादेवी औद्योगिक सहकारी संस्थेची सूतगिरणी जिल्हा बँकेने जप्त केली आहे.

लिलावाद्वारे तिच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. संस्थेत पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीचा आप्त जिल्हा बँकेत अध्यक्ष असताना हे कर्ज वाटप करण्यात आल्याचे सांगितले जाते. जामिनकीच्या हमी पत्रानुसार संचालकांविरुध्द फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुलीवर भर दिला आहे. त्यासाठी जिल्हयातील टॉप १०० तसेच कालुकानिहाय टॉप १०० थकबाकीदारांची यादी जाहीर केलेली आहे. या पाठोपाठ बॅंकेने जप्त केलेल्या वाहन, जमीन, मालमत्ता याचे लिलाव प्रक्रीया देखील सुरू केली आहे. याच कारवाई अंतर्गत मालेगावच्या द्याने येथील रेणुकादेवी औद्योगिक सहकारी संस्थेची मालमत्ता जप्त केली गेली होती.

या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्रीसाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख पाच जानेवारी असून सहा तारखेला निविदा उघडल्या जाणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. मालेगावच्या राजकीय क्षेत्रातील वजनदार कुटुंबातील एक व्यक्ती रेणुकादेवी सहकारी संस्थेत पदाधिकारी होती. याच कुटुंबातील एक व्यक्ती जिल्हा बँकेत अध्यक्ष असताना त्या संस्थेला कर्जवाटप करण्यात आल्याचे बॅंकेकडून सांगितले जाते.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

थकबाकी वसुलीसाठी अनेकदा फौजदारी कारवाई करण्याचा प्रयत्न बॅंकेकडून झाला. मात्र, राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कारवाई होत नव्हती. यातच संबंधित संस्थेने न्यायालयात यचिका देखील केली होती. रेणुकादेवी औद्योगिक संस्थेची मालेगावच्या द्याने येथे सूतगिरणी आहे. या संस्थेकडे सात कोटी ४६ लाखाचे मुद्दल व २२ कोटी १५ लाखाचे व्याज थकीत आहे. संस्थेकडून कर्जाची परतफेड झाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर बँकेने संस्थेची मालमत्ता जप्तीची कारवाई केली. या मालमत्तेचा आता लिलाव करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT