The panoramic scene of the coronation in 'The Eighth Form of Shivaraya'. esakal
नाशिक

Shiv Jayanti 2024 : ‘शिवरायांचे आठवावे रूप’ महानाट्य येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी

Shiv Jayanti 2024 : ओझर शिवजयंती उत्सव समितीतर्फे धांगडधिंगा न करता वैचारिक संदेश देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Shiv Jayanti 2024 : येथील स्थिरस्थावर मंडळींनी एकत्र येत ‘शिवरायांचे आठवावे रूप’, हे महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकपर्यंतचा अतिभव्य जिवंतपणा आणणारे महानाट्य उभे केले आहे. ओझर शिवजयंती उत्सव समितीतर्फे धांगडधिंगा न करता वैचारिक संदेश देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. (nashik Shiv Jayanti 2024 marathi news )

कमाईचा कुठलाही उद्देश उराशी न बाळगता केवळ छत्रपती शिवाजी महाराज काय होते? त्यांचे विचार आणि अठरा पगड जातींना सोबत घेत त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा मूळ हेतू पुढच्या पिढीला दाखविण्याची धडपड त्यात आहे. मेडिकल व्यवसायिक श्रीकांत कदम शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत आहेत, तर म्हाताऱ्या जिजाऊंचा भूमिकेत ८५ वर्षांच्या गजराबाई बाबूराव कदम भूमिका करणार आहेत.

‘एचएएल’मधून निवृत्त झालेले श्‍याम विसपुते यांचे मेकअप आणि दिग्दर्शन तितकेच भावणार आहे. पूजा जाधव आणि कांचनमाला हुजरे जिजाऊ आणि बडीबेगम यांच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही गृहिणी जीवघेण्या आजारातून बऱ्या होऊन समाजाला आदर्श संदेश अभिनयातून देत आहेत.

एकूणच बुजुर्ग माणसापासून चिमुकमल्यापर्यंत जवळपास ७० लोकांनी महिनाभर एकत्र सराव करून हे महानाट्य आकारास आणले आहे. सगळे प्रपंच असलेली लोक यंदा तीन प्रयोग सादर करणार आहेत. मागील वर्षापासून त्यांना मागणी वाढत असताना, सर्व साथीदारांचा वेळ लक्षात घेऊन ते प्रयोग सादर करतात.

सध्याच्या कॉर्पोरेट युगात महाराजांचे आचारविचार समाजात रुजविण्याचे अनोखे कार्य हा समूह करीत आहे, ही ओझरकरांच्या दृष्टीने आभिमानास्पद बाब आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य प्रेम’, ‘शूरवीर बाणा’, ‘धार्मिक सुरक्षा’, ‘लढवय्ये धोरण’, त्यांच्यातील असलेला ‘अतिउच्च गुण’, हाच संदेश पुढे नेत या समूहाने रोज सायंकाळी दोन तास सराव करत त्यात हुबेहूबपणा आणला आहे.

मागील वर्षी तासाभरात हे महानाट्य साकारले, तेव्हा खंडेराव महाराज यात्रा मैदानावर झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांची ऊर्जा कायम ठेवली आहे. यंदा दिंडोरी, ओझर, जेल रोड, पिंपळगाव आणि कोपरगाव याठिकाणी हे प्रयोग सादर होणार आहेत. एक रुपया कमाईचे उद्दिष्ट न ठेवता एक अनोखा विचार घेऊन हा शिवाई समूह करीत असलेले कार्य निश्चित प्रेरणादायी असल्याचे मत हजारो शिवप्रेमींनी व्यक्त केले.

पात्र करणारे कलाकार.

श्याम विसपुते : मेकअप व दिग्दर्शन

पूजा जाधव : जिजाऊ

कांचनमाला हुजरे पाटील : बडी बेगम

मीनल कदम : सईबाई, राणीसाहेब

यामिनी वानखेडे : दीपाई आऊसाहेब

रोशन शेवाळे : अफजल खान

अमोल किरपेकर : कृष्णाजीपंत

सतीश क्षीरसागर : गोपीनाथ पंत बोकील

जयेश खैरनार : आदिलशहा

देवेंद्र जाधव : औरंगजेब

हरीश करपे : बहिरजी नाईक

रोहित वाघ : शिवा काशीद

विशाल मालसाने : बाजीप्रभू देशपांडे

आदित्य कदम : रायजी बांदल

समर्थ कदम : तानाजी मालुसरे

गजराबाई कदम व वर्ष आहेर : म्हाताऱ्या जिजाऊ

पवन आहेर : कानोजी जेधे

नितीन पगारे : हिरोजी इंदलकर

महेश वाघ : इंग्रज

निशांत बुरकुले : कडकलक्ष्मी

आनंदा भिलावडे : गागाभट्ट

शाहीर : अलंकार गायकवाड, प्रथमेश पवार, ओम शेळके, गौरव कदम

नृत्य : सारा पाटील, इंद्रायणी शेळके, दिशा थोरात, सेजल कदम

संकल्पना : श्रीकांत कदम व गौरव कदम ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bee Attack on Cricket Match : क्रिकेट सामन्यावर मधमाशांचा हल्ला!, १० मिनिटांत ५० हून अधिक मधमाशांनी 'डंक' दिल्याने ‘अम्पायर’चा मृत्यू

"टॉयलेट स्वच्छ नाही, मेकअपरूममध्ये.." मराठी अभिनेत्रीचा नाट्यगृहांबाबत खुलासा "बऱ्याचदा आम्ही.."

Latest Marathi News Live Update : चाळीसगाव शहरात शिवजयंतीच्या कार्यक्रमात पोलिस आणि शिवप्रेमीत बाचाबाची

शिंदेंची शिवसेना घेणार बीएमसीच्या महापौरपदाची धुरा! भाजपसोबत दीड वर्षांचा फॉर्म्युला ठरला; सत्तेचे समीकरण बदलले

SL vs ZIM, T20 WC: झिम्बाब्वेचा आणखी एक दे धक्का! ऑस्ट्रेलियानंतर यजमान श्रीलंकेला नमवले; टीम इंडियाला आव्हान दिले

SCROLL FOR NEXT