A magnificent 65 feet statue of Chhatrapati Shivaji Maharaj erected by Ashok Pillar Mitra Mandal. In the second photo, the Malegaon Stand Mitra Mandal is a grand scene. esakal
नाशिक

Shiv Jayanti 2024 : आज शिवजन्मोत्सव सोहळा; उत्साह शिगेला

Shiv Jayanti 2024 : स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोमवारी (ता.१९) भव्य स्वरूपात साजरी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Shiv Jayanti 2024 : स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोमवारी (ता.१९) भव्य स्वरूपात साजरी होत आहे. त्यानिमित्त शहरातील मुख्य चौक भगवे ध्वज आणि पताकांनी सजल्याने अवघे शहर भगवेमय झाले आहेत. विविध मित्र मंडळांसह राजकीय पक्षांशी निगडित नेत्यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावरील भव्य देखावे उभारले आहेत. तर, विविध ठिकाणी शिवचित्रकारांचे व्याख्यान आयोजित केले आहे. (Shivjanmotsav celebration started today in city )

भगव्या पताका, स्टेज, मंडप उभारून शिवरायांच्या जीवनावर आधारित देखावे साकारले आहेत. सोमवारी शहरात ठिकठिकाणी मिरवणुकाही निघणार आहेत. अशोक स्तंभाजवळ अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळाने तब्बल ६५ फूट उंच शिवरायांची भव्य मूर्ती साकारली आहे.

तर पंचवटी कारंजा येथे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ठिकठिकाणी गडकिल्ल्यांसह शिवरायांची भव्य मूर्ती साकारली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल एक महिना अहोरात्र मेहनत घेतली. मूर्तीत शिवरायांच्या हातात राजदंड, तलवार आणि पोषाख वाढवला आहे.

पोषाखाचा रंगही चमकदार असून तो उठून दिसतो. त्र्यंबकेश्वर रोडवरील मूर्तिकार हितेश पाटोळे व हेमंत पाटोळे यांनी ही मूर्ती साकारली. तसेच पंचवटी कारंजा येथील शिवजन्मोत्सव सोहळा मित्र मंडळाने यंदा साकारलेल्या ४५ फूट उंच आणि १५० फुटांच्या गोलाकार अयोध्येतील राम मंदिर प्रतिकृतीत शिवरायांचा पुतळा आहे.

मुंबईतील २५ कलाकारांनी १२ दिवस अहोरात्र मेहनत घेत ते साकारले. शिवजयंतीनिमित्त मंडळातर्फे नितीन बानगुडे पाटील यांचे शिवव्याख्यान झाले. तसेच सोमवारी रक्तदान, नेत्रतपासणी शिबिर व युवकांची रिल्स स्पर्धा होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौरव गोवर्धने व कार्याध्यक्ष मंगेश धनवटे यांनी सांगितले.

मालेगाव स्टॅण्ड मित्र मंडळाने छत्रपती शिवरायांची मूर्ती व आई तुळजा भवानी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. रविवारी रात्रीच शिवजन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला असून, त्यासाठी आकर्षक रोषणाई व लेसर लावले आहेत. डिजेसह भव्य स्टेजही उभारल्याने शिवरायांच्या आरतीसाठी शहर सज्ज झाले आहे.

६५ फूट मूर्तीचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

अशोक स्तंभ येथे साकारलेल्या शिवरायांच्या ६५ फूट उंच मूर्तीची वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन येथे नोंद झाली आहे. पूर्वी ६१ फूट उंचीच्या शिवराय मूर्तीचे रेकॉर्ड होते. राजदंड, भवानी तलवार यांसह ६५ फूट उंच शिवरायांच्या मूर्तीचे वजन तब्बल ७ टन एवढे नोंदवल्याची माहिती वंडर बुक ऑफ रेकॉर्ड चिफ इन्व्हिजिलेटर, वेस्टर्न इंडियाच्या अमी छेडा यांनी दिली.

''छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे प्रेरणास्थान असल्यामुळे त्यांच्या नावाने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्याची इच्छा होती. ६५ फूट उंच मूर्ती उभी करण्यासाठी सात हायड्रा व क्रेन लागले. चार दिवसांपासून अहोरात्र हे काम सुरु होते.''-व्यंकटेश मोरे, अध्यक्ष (अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मंडळ)

''नाशिककरांना अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घडावे, या उद्देशाने मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मुंबईतील कारागिरांनी हे मंदिर साकारले आहे. मंडळातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.''- ॲड. गौरव गोवर्धने, अध्यक्ष (पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: भाषांपासून अंतराळ केंद्रापर्यंत! पुण्यातील सरकारी शाळेतील मुलांची नासामध्ये निवड; विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नवा अध्याय

Maharashtra: आता लहान मासे पकडले तर थेट कारवाई! माशांच्या पुनरुत्पादनासाठी महायुती सरकारचा ‘गेम चेंजर’ निर्णय

IND vs WI, 2nd Test: वेस्ट इंडिजचं कौतुक करायला हवं... फॉलोऑननंतरही भारतासमोर उभं केलं आव्हान; शुभमन गिलच्या संघाच्या टप्प्यात विजय

Video : कॅन्सरसही लढा देणाऱ्या मुलीने डॉक्टरसोबत बनवली रील; 'तडपाओगे..' गाण्याने भावुक झाले लोक, मृत्युच्या दारातला व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: ठाण्यात मनसे-ठाकरे सेनेचा मोर्चा

SCROLL FOR NEXT