Detached roof on Nivara Shed at Nimani Bus Stand. In the second photo, water accumulated due to rain esakal
नाशिक

Nashik News : निमाणी बसस्थानकाला अवकळा; खड्डे, साचणाऱ्या पाण्याने त्रास

Nashik : पाऊस पडला की त्यावर पडणारे पाणी, झाडांचा सतत पडत असलेला पालापाचोळा अशी सध्या या बसस्थानकाची अवस्था झालेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निमाणी बसस्थानकाची अवकळा संपण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे. बस वळसा घेण्याच्या ठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साचलेले पाणी, निवारा शेडचे निघालेले छत, उघडे पडलेले बाकडी, पाऊस पडला की त्यावर पडणारे पाणी, झाडांचा सतत पडत असलेला पालापाचोळा अशी सध्या या बसस्थानकाची अवस्था झालेली आहे. प्रवाशांची वर्दळ वाढलेल्या या निमाणी बसस्थानकाला अवकळा आली आहे. (Nimani bus station is suffering due to potholes and accumulated water )

नाशिक शहरातील विविध भागात जाणाऱ्या बस याच स्थानकावरून सुटतात. सिटीबस सेवेच्या वेळीही येथूनच बस सुटत होत्या, सिटी बस सेवेसाठीही याच बसस्थानकचा वापर केला जात आहे. बसस्थानकावरील बस वळण्याच्या जागेतील खड्ड्यांची समस्या सिटी बससेवेच्या काळापासून आहे. किमान महापालिकेने बससेवा सुरू केल्यानंतर तरी स्थानकातील या खड्ड्यांची समस्या सुटेल, अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करीत होते.

मात्र, बरीच वर्ष पूर्ण होऊनदेखील ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. येथील खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दहा वर्षांपूर्वी निमाणी बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम खासदार निधीतून करण्यात आले होते. एक आदर्शवत बसस्थानक म्हणून गणना केली जात होती. त्यात सध्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. (latest marathi news)

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि निवाऱ्यासाठी निमाणी बसस्थानकात उभारलेल्या शेडचे छत असलेले फ्लेक्स आठ दिवसांपूर्वी निघाले. ते अजूनही या शेडच्या जागेत लोंबकळणाऱ्या अवस्थेत आहेत. ज्या भागातील छत निघालेले आहे. येथील भाग मोकळा झाल्याने पावसाचे पाणी थेट शेडमध्ये पडत आहे. येथे मांडण्यात आलेल्या बाकांवर प्रवाशांना बसणे शक्य होत नाही. प्रवाशांना इतर भागातील निवाऱ्याचा आश्रय घ्यावा लागत आहे.

परिसरात दुर्गंधी

बसस्थानकाच्या कार्यालयावरील छत निघालेले असल्याने या कार्यालयाचाही निवारा गेला आहे. शेडच्या छत निघालेल्या भागावर झाडाच्या फांद्या आहेत. त्याचा पालापाचोळा, मोडून पडलेल्या डहाळ्या यांचा कचरा खाली पडत आहेत. तो नेमका या बाकांवर पडत आहे. बसस्थानक आवारात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले दिसून येत आहे, तसेच दुर्गंधीदेखील पसरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND, 4Th T20I: अर्शदीपने ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा अफलातून कॅच घेतला अन मॅच भारताकडे फिरली; पाहा टर्निंग पाँइंट ठरलेला क्षण

Pune News : पुणे महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी

शूटिंगवरून परतल्यावर रोजची भेट! अभिनेत्री जुई गडकरीचा स्ट्रीट डॉग्स सोबतचा हृदयस्पर्शी प्रवास

Buldhana Crime : मध्य प्रदेश मधील अग्नी शस्त्र निर्मिती; गृह खात्यासाठी ठरतेय डोकेदुखी

Junnar Leopard's : जुन्नर तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीवनाधिकार धोक्यात; वन विभागाला तातडीची नोटीस!

SCROLL FOR NEXT