NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik NMC News : शहरात थकबाकीदारांच्या 641 नळजोडण्या खंडित

Nashik NMC : महापालिकेकडे थकबाकी अदा ना करणाऱ्या ६४१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करत थकबाकीदार विरोधात कर विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : वारंवार नोटीस बजावूनही महापालिकेकडे थकबाकी अदा ना करणाऱ्या ६४१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करत थकबाकीदार विरोधात कर विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे. यंदा महापालिकेने घरपट्टीमध्ये २०६ कोटी रुपयांची वसुली केली आहे. मागील काही वर्षात सर्वाधिक वसुली झाली आहे. पाणीपट्टीचीदेखील ५४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मात्र पाणीपट्टी वसुली ही सरासरी आहे. (Nashik NMC News)

विविध कर विभागाला ७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ५४ कोटी रुपये वसुली झाली. जानेवारी महिन्यात पाणीपट्टीची अपेक्षित वसुली होत नसल्याने कर विभागाने थकबाकीदांराविरोधात मोहीम उघडली. शहरात २ लाख ७ हजार नळजोडण्या आहेत. त्यातील ४४ हजार ३८५ नळजोडणी धारकांकडे ९५.७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यानंतर नोटीस देऊनही अपेक्षित वसुली होत नसल्याने २२ फेब्रुवारीपासून मोठ्या थकबाकीदारांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली. मोहिमेसाठी संयुक्त पथके तयार करण्यात आली. पथकांच्या माध्यमातून ६४१ थकबाकीदारांच्या नळजोडणी खंडित करण्यात आल्या. (latest marathi news)

थकबाकी अदा केल्यानंतर नळजोडण्या पूर्ववत केल्या जाणार असून, परस्पर नळजोडणी केल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.

अशी झाली कारवाई

विभाग खंडित नळजोडणी संख्या

सिडको २९८

सातपूर १३३

नाशिक रोड ११४

पंचवटी ८२

पूर्व ८

पश्चिम ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिरा भाईंदर जैनांची नगरी, भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद; उलटे-सुलटे धंदे बंद करण्याचा मनसेचा इशारा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांचा 'अकरा प्लस'चा डाव, अध्यक्षपदासाठी चुलत भावाचंही नाव; आमदार पडळकरांचा गंभीर आरोप

Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा वाल्मिक कराडचा डाव', बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली

Mumbai Weather: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ७२ तास घराबाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Live Update : शरद पवार उद्यापासून दुष्काळ दौऱ्यावर; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT