Nashik NMC News esakal
नाशिक

NMC News : जीएसटीतून महापालिकेला अतिरिक्त 102 कोटी

NMC : जकात व एलबीटी कर बंद झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासकामे मार्गे लावण्यासाठी शासनाकडून जीएसटी सुरू करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : जकात व एलबीटी कर बंद झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासकामे मार्गे लावण्यासाठी शासनाकडून जीएसटी सुरू करण्यात आली. नाशिक महापालिकेला मागील आर्थिक वर्षात १२८४ कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून प्राप्त झाले. त्यात आता आठ टक्के वाढ होऊन १०२ कोटी ७२ लाख रुपये वार्षिक अतिरिक्त प्राप्त होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना हक्काचे उत्पन्न म्हणून जकात वसूल करण्याचे अधिकार होते. (nashik NMC Additional 102 crore to Municipal Corporation from GST marathi news)

परंतु जकात ही संकल्पना मोडीत काढत त्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू झाला. परंतु, हा करदेखील कालबाह्य ठरला. त्याचप्रमाणे देशभरात जीएसटी लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याअनुषंगाने जकात व एलबीटी या दोन्ही करवसुली प्रणाली बंद झाल्या. त्याऐवजी शासनाकडून जीएसटी स्वरूपात अनुदान प्राप्त होते. मागील सहा वर्षात नाशिक महापालिकेला जीएसटी अनुदान प्राप्त होते. (latest marathi news)

दरवर्षी त्यात आठ टक्क्याने वाढ होते. २०२३ व २४ या आर्थिक वर्षांमध्ये नाशिक महापालिकेला १२८४ कोटी रुपये वार्षिक जीएसटी प्राप्त झाला. त्यावर आता आठ टक्के वाढ होऊन १०२.७२ कोटी रुपये वाढ होणार आहे. नाशिक महापालिकेला वाढीव जीएसटी अनुदान धरून १३८६.७२ कोटी रुपये वार्षिक जीएसटी अनुदान प्राप्त होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT