NMC Adult BCG campaign esakal
नाशिक

Nashik NMC News : शहर क्षयमुक्त करण्यासाठी ‘Adult BCG’ अभियान!

Nashik News : महापालिका हद्दीमध्ये शहर क्षयमुक्त करण्यासाठी ॲडल्ट बीसीजी अभियान राबविले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका हद्दीमध्ये शहर क्षयमुक्त करण्यासाठी ॲडल्ट बीसीजी अभियान राबविले जाणार आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (Adult BCG campaign) व आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने अठरा वर्षांवरील व्यक्तींचे बीसीजी लसीकरण केले जाणार आहे. (Nashik NMC Adult BCG campaign tuberculosis marathi news)

महापालिकेच्या क्षयरोग विभाग व लसीकरण विभागाकडून आयएमए हॉलमध्ये लसीकरण कार्यक्रम होईल. महापालिका व राष्ट्रीय शहर व लसीकरण कार्यक्रम विभागाच्या माध्यमातून शहरात क्षयरोग दुरीकरणासाठी अठरा वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांना पूर्वीचे टीबी रुग्ण टीव्ही रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती, वय वर्ष साठपेक्षा जास्त असलेले नागरिक, मधुमेहाचे रुग्ण, धूम्रपान करणारे कुपोषितांना बीसीजीएस महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत एप्रिल महिन्यापासून दिली जाणार आहे.  (latest marathi news)

लसीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व खासगी व शासकीय यंत्रणेने एकत्र येण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. २०२५ पर्यंत टीबी निर्मूलन मोहिमेअंतर्गत लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. बीसीजी लस इतर आजारांविरोधातही परिणामकारक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे अठरा वर्षावरील नागरिकांसाठी एप्रिलपासून मोहीम सुरू केली जाणार आहे. २०२५ पर्यंत टीव्ही निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Municipal Election 2026 : चंद्रपुरात भाजपा सत्ता राखणार? 'या' प्रभागातील लढतीकडे सर्वाचं लक्ष, प्रतिष्ठा पणाला

Pune Voter Awareness : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये; हडपसर परिसरात 'स्विप'चा जागर!

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरमध्ये 'या' प्रभागात चुरशीची लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

ZP Election Date 2026 : जिल्हा परिषद निवडणुका मार्च-एप्रिलपर्यंत लांबणार नाही; 'थेट तारीख' निश्चित झाल्याने राजकीय रणधुमाळीला वेग!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या संजनाताई पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT