NMC News
NMC News esakal
नाशिक

Nashik NMC News : पाणीपट्टी देयके वाटपासाठी खासगी अभिकर्त्यांची नियुक्ती!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मालमत्ता कराचे देयके वाटप खासगी अभिकर्त्यांच्या माध्यमातून करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर आता पाणीपट्टी देयकांचे वाटप करण्यासाठीदेखील खासगी अभिकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. जवळपास २ लाख ९ हजार देयके वाटप केले जाणार आहे. (Nashik NMC water bill payment marathi news)

नागरिकांना वेळेच्या आत देयके न पोचल्याने पाणीपट्टी शंभर टक्के वसुल होत नाही व थकबाकी वर्षागणिक वाढत असल्याने खासगी संस्थेच्या माध्यमातून देयकांचे वाटप केले जाणार आहे. शासनाकडून जीएसटी माध्यमातून प्राप्त होणारे अनुदान तसेच घर व पाणीपट्टी हे महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहे.

शासनाच्या माध्यमातून मासिक नियमित जीएसटीचे अनुदान प्राप्त होते. यंदा घरपट्टीतून जवळपास १८५ कोटी रुपये उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत घरपट्टी समाधानकारक वसुली झाली आहे. परंतु पाणीपट्टी वसुलीच्या बाबतीत अपेक्षित यश पदरात पडताना दिसत नाही.

पाणीपट्टीच्या माध्यमातून ७५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र जवळपास सव्वा कोटीहून अधिक उत्पन्न कमी झाले. घरपट्टीप्रमाणे पाणीपट्टीदेखील देयके ग्राहकांपर्यंत पोचतात. मात्र जवळपास ४० टक्के ग्राहकांना पाण्याची बिले मिळतं नाही. मागील वर्षाची बेसलाईन निश्चित करून देयके ग्राहकांपर्यंत पोचविणे आवश्यक असते.

परंतु मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने ग्राहकांपर्यंत देयके पोचत नाही. ग्राहकांनीही स्वतः पाणी मीटरचे फोटो रीडिंग पाठविणे अपेक्षित आहे, परंतु ग्राहकांकडूनही रीडिंग पाठविले जात नाही. पाणीपुरवठा हे महापालिकेच्या उत्पन्नाचे साधन नसले तरी किमान पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च तरी सुटला पाहिजे, असे अपेक्षित आहे. परंतु पाणीपुरवठा योजना सातत्याने तोट्यात जात असल्याने शंभर टक्के वसुली करण्यासाठी ग्राहकांपर्यंत देयके वाटप खासगी संस्थेमार्फत केले जाणार आहे. . (latest marathi news)

केवळ ९५ कर्मचारी कार्यरत

पिंपरी चिंचवड विभागाच्या धर्तीवर प्रशासनाने घरपट्टी देयकांचे वाटप बाह्य अभिकरणामार्फत केले जाणार आहे. घर व पाणीपट्टी शंभर टक्के वसुल करण्यासाठी मनुष्यबळ नाही. देयके वाटपासाठी जवळपास २१५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना केवळ ९५ कर्मचारी कार्यरत आहेत.

घरपट्टी वसुलीसाठी यंदा अडीचशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. महावितरण कंपनीच्या देयके वाटपाच्या धर्तीवर घरपट्टी देयके खासगी अभिकरणामार्फत वाटप करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता पाणीपट्टीची देयके खासगी अभिकरणामार्फत वाटप केले जाणार आहे. शहरात दोन लाख नऊ हजार देयकांचे वाटप केले जाणार आहे.

अनधिकृत नळजोडणी शोधणार

खासगी ठेकेदारावर शहरातील प्रत्येक मिळकतीचा पूर्ण पत्ता, मिळकतधारकाचा भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल, विद्युत देयकाचा ग्राहक क्रमांकाची नोंद संगणकावर घेणे, प्रतिवर्षी एप्रिलमध्ये घरपट्टीच्या देयकांचे वाटप करणे, वार्षिक मागणीची छपाई करणे, नळजोडणीधारकांचे सर्वेक्षण, पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी, ई-मेल, मालमत्ता कराचा इंडेक्स क्रमांक, विद्युत देयकाचा ग्राहक क्रमांक, अनधिकृत नळजोडणी शोधमोहिम, नोटिसा बजावणे आदी कामांची जबाबदारी राहणार आहे.

"पाणी योजनांवरचा किमान खर्च वसुल करण्यासाठी वसुली होणे गरजेचे आहे. वसुलीसाठी ग्राहकांच्या हातात वेळेत देयके हाती पडणे गरजेचे आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याने खासगी संस्थेच्या माध्यमातून देयके वाटप केले जाणार आहे."

- श्रीकांत पवार, उपायुक्त, कर विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT