road digging for MNGL esakal
नाशिक

Nashik NMC News : रस्ता खोदकामात केबल तुटल्यास बदलण्याची जबाबदारी ठेकेदाराची!

NMC News : महापालिकेच्या विद्युत विभागाकडे प्राप्त होणाऱ्या विद्युत विषयक एकूण तक्रारींपैकी जवळपास ९९ टक्के तक्रारी रस्ता खोदाईमुळे केबल तुटल्याचे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : महापालिकेच्या विद्युत विभागाकडे प्राप्त होणाऱ्या विद्युत विषयक एकूण तक्रारींपैकी जवळपास ९९ टक्के तक्रारी रस्ता खोदाईमुळे केबल तुटल्याचे आहेत. त्यातून वीजपुरवठा खंडित झाल्याच्या प्रकारातील असल्याने रस्त्यावर खड्डे करताना केबल तुटल्यास बदलण्याची जबाबदारीदेखील ठेकेदारावर टाकली जाणार आहे. (Nashik NMC contractor responsible for replacing cable breaks in road digging marathi news)

महापालिका हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते खोदाईची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रस्त्यांची खोदाई ड्रेनेजलाइन, पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी होते. आता त्याचबरोबर ऑप्टिक फायबर केबल व अन्य केबल टाकण्यासाठी खुदाई केली जाते. मागील चार वर्षांपासून शहरात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई करण्याचे काम सुरू आहे.

या खोदाईतून नागरिकांना मोठा मनस्ताप करावा लागतो. अनेक ठिकाणी रस्त्यावर खोदलेली माती लेव्हल न केल्याने तसेच खड्डे तसेच ठेवल्याने अपघात होऊन अनेक नागरिक कायमचे जायबंदी झाले आहेत. रस्ते खोदाईच्या तक्रारी अद्यापपर्यंत संपताना दिसत नाही. महापालिकेच्या विद्युत विभागाला तक्रारींचा मासिक अहवाल प्राप्त झाला.

यामध्ये ४७२ तक्रारींचा समावेश आहे. ४७२ तक्रारींपैकी ३६९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. ४७२ तक्रारींपैकी जवळपास ४७० तक्रारी या रस्ता खोदल्यामुळे केबल तुटून वीजपुरवठा बंद झाल्याच्या आहेत. याचाच अर्थ शहरात रस्ते खोदाई बंद झाल्यानंतर विद्युत विषयक तक्रारींचे प्रमाण १ ते २ टक्क्यांपर्यंत कमी होईल.   (latest marathi news)

विभाग विद्युतविषयक तक्रारी

विभाग तक्रारींची संख्या

नाशिक रोड ९०

नाशिक पूर्व ८३

नाशिक पश्चिम ३१

सिडको १०४

पंचवटी ९९

सातपूर ६५

----------------------

एकूण ४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT