CCTV in GPO water tank premises esakal
नाशिक

Nashik NMC News : जीपीओ जलकुंभ आवारातील CCTV ठरले शोभेच्या वास्तू!

Nashik News : महापालिका जीपीओ जलकुंभ आवारात स्मार्टसिटीअंतर्गत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : महापालिका जीपीओ जलकुंभ आवारात स्मार्टसिटीअंतर्गत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. कॅमेरे सुरू नसल्याने ते केवळ शोभेच्या वस्तू ठरत आहे. परिसरात मद्यपी आणि टवाळखोरांचा वावर दैनंदिन वाढतच आहे. आवरास एका बाजूस संरक्षण भिंतच नसून अन्य तीन भागांच्या भिंतींचीही दुरावस्था झाली आहे. त्यामुळे जलकुंभ आणि आवार रामभरोसे आहे. (Nashik GPO Jalkumbh premises CCTV of no use building)

जलकुंभ परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या आशयाचा फलकदेखील लावला आहे. काही दिवसांपूर्वी जलकुंभ सुरक्षा कारणास्तव स्मार्टसिटी अंतर्गत जलकुंभ आवारात सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. फलक आणि कॅमेरे दोघांनाही तिलांजली देत जलकुंभ आवारात सर्रास टवाळखोरांचा वावर दिसून येत आहे.

जुगाराचे डाव, मद्याच्या पार्ट्या सुरू आहेत. याकडे लक्ष नसल्याने आवार रामभरोसे असल्याचे भासत आहे. दिवसेंदिवस जीपीओ जलकुंभ आवाराची दुरावस्था होत आहे. जलकुंभ आवारातील मंदिर परिसरात जुगारीचे डाव रंगत आहे. त्याचप्रमाणे टवाळखोर रस्त्यावरील भिकारी आवारात प्रवेश करून नशा करताना अनेकदा दिसून येत आहे. (latest marathi news)

ठिकठिकाणी कचरा जाळून परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. प्रतिबंधक क्षेत्र म्हणून आवार नावालाच राहिला आहे. त्याचप्रमाणे येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण आवारात कचरा पडून आहे. संरक्षण भिंत नसल्याने नागरिकही आवारात कचरा फेकत आहे.

त्यामुळे दुर्गंधी वाढली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉलच्या खड्ड्यांमध्ये कचरा कुजून अधिक प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. बऱ्याच वेळा पाइपलाइनमधून दूषित पाणीपुरवठा होण्याच्या घटना घडत आहे. महापालिकेकडून याकडे लक्ष देत आवाराची स्वच्छता करावी. टवाळखोर आणि भिकाऱ्यांना आवारात येण्यास प्रतिबंध करावा, सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT