President of the organization Vikram Kadam, General Secretary Ganesh Bodke and office bearers while giving a statement to the Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis. esakal
नाशिक

NMC Hoarding Case: खासगी जागेतील होर्डिंगधारकांना न्याय मिळवून देवू; घोटाळ्याच्या चौकशीचे उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन

Nashik News : महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाने दहा वर्षासाठी शहरातील मोकळ्या जागांवर २८ ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठी जानेवारी २०२२ ला निविदा काढली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका जाहिरात व परवाने विभागातून महापालिका हद्दीतील स्वमालकीच्या खुल्या २८ जागांवर जाहिरात फलक उभारणीची निविदा काढली परंतु निविदा, कार्यादेश व करारनाम्यात मोठी तफावत आहे. कार्यादेशात मक्तेदारास फायदेशीर होतील असे अनेक बदल करून त्या माध्यमातून घोटाळा (Scam) झाल्याचा आरोप नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने केल्यानंतर त्यासंबंधी आयुक्तांनी चौकशी समिती गठित केली.

समितीकडून या प्रकरणाच्या चौकशीला अद्याप सुरवात झाली नाही. दरम्यान असोसिएशनने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून न्याय देण्याचे आश्र्वासन यावेळी दिले. (Nashik NMC Hoarding Case Fadnavis marathi news)

महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाने दहा वर्षासाठी शहरातील मोकळ्या जागांवर २८ ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठी जानेवारी २०२२ ला निविदा काढली. मार्कविस ॲडव्हर्टायझिंग ॲन्ड मार्केटिंग या कंपनीला काम मिळाले, परंतु कार्यादेश व करारनामा यात मक्तेदारास फायदेशीर होतील अशा अटी टाकण्यात आल्याने यातून महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप असोसिएशनने केला.

यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे यांची भेट घेत निवेदन दिले. त्यानंतर महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले व आयुक्तांनी तातडीने चार अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली.

उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असताना असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम, माजी अध्यक्ष मच्छिंद्र देशमुख, उपाध्यक्ष इम्तियाज अत्तार, सरचिटणीस गणेश बोडके, विष्णुपंत पवार, रवी शिरसाट, निखिल सुराणा, बंटी धनविजय, विराज पवार व पदाधिकारी उपस्थित होते. (Latest Marathi News)

करारापेक्षा अधिक फलक

नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने माहितीच्या अधिकारात निविदा संबंधी अनेक कागदपत्रे मागविले असून यातून मार्कविस ॲडव्हर्टायझिंग यांनी मनपास उत्पन्न वाढीच्या नावाखाली अनेक गोष्टी मागितल्याचे असोसिएशनच्या वतीने दावा करण्यात आला.

यात २८ खुल्या जागेतील जाहिरात फलक उभारण्याचे काम असताना मक्तेदाराने याहून अधिक फलक उभारल्याचे व आणखी १२६ फलकांसाठी जागा मागितल्याचे आढळले. यासंदर्भात महापालिकेने ३० ऑक्टोबर २०२३ ला १० अधिकाऱ्यांची समिती नेमून परवानगी देण्याची व मक्तेदारास येत असलेल्या अडचणी सोडविण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT