Ongoing work of payment of dues in Eastern Divisional Office on Sunday holiday. esakal
नाशिक

Nashik NMC News : पूर्व विभागात सुटीच्या दिवशी 2 लाख 80 हजारांचा भरणा

Nashik NMC : मार्चअखेरनिमित्ताने महापालिकेतर्फे विभागीय कार्यालय घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी सुटीच्या दिवशी खुले ठेवण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : मार्चअखेरनिमित्ताने महापालिकेतर्फे विभागीय कार्यालय घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी सुटीच्या दिवशी खुले ठेवण्यात आले आहे. पूर्व विभागीय कार्यालयात शनिवार आणि रविवार दोन सुटीच्या दिवशी सुमारे दोन लाख ८० हजारांचा भरणा लाभार्थ्यांकडून भरण्यात आला आहे. त्यानिमित्ताने महापालिकेच्या तिजोरीत काहीशी भर पडली आहे. महापालिकेत मार्चअखेरचे कामे सुरू आहे. (Nashik NMC Payment of 2 lakh 80 thousand on holidays in East Division)

घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मोठ्या थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अन्य थकबाकीदारांनाही थकबाकी भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. थकबाकी भरणाऱ्यांसाठी महापालिकेतर्फे विभागीय कार्यालय सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे.

पूर्व विभागीय कार्यालयाचा विचार केला तर शनिवार (ता. २३) आणि रविवार (ता. २४) या दोन सुटीच्या दिवशी नागरिकांनी प्रतिसाद देत दोन लाख ८० हजारांचा भरणा केला आहे. शनिवारी एक लाख ७९ हजारांचा, तर उर्वरित सुमारे एक लाख एक हजारांचा भरणा झाल्याची माहिती प्राप्त झाली. (latest marathi news)

त्याचप्रमाणे इतरही विविध प्रकारची वसुली मोहीम सुरू आहे. महापालिकेचे थकबाकी गाळेधारकांकडून थेट कर्मचाऱ्यांकडून वसुली केली जात आहे.

१ मार्च ते २४ मार्च, अशा २४ दिवसांत सुमारे ९२ गाळ्यांच्या थकबाकीपोटी सुमारे २३ लाख ३३ हजारांची वसुली करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत अशाच प्रकारे वसुली सुरू राहणार आहे. त्यानंतरही थकबाकीदार असणाऱ्यांवर महापालिकेतर्फे नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT