nmc esakal
नाशिक

NMC News : वृक्ष लागवडीसाठी 5 कोटीची तरतूद; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 25 हजार वृक्षांचे रोपण

NMC : लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू असली तरी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची विशेष परवानगी घेऊन शहरांमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर २५ हजार वृक्ष लावले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू असली तरी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची विशेष परवानगी घेऊन शहरांमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर २५ हजार वृक्ष लावले जाणार आहे. वृक्ष लागवडीसाठी अंदाजपत्रकात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून हा खर्च केला जाणार आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून वृक्षांची लागवड केली जाते. (nashik NMC Provision of 5 crores for tree plantation in city marathi news)

यंदाही वृक्ष लागवड करण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे. महापालिकेसह स्वयंसेवी संघटना तसेच नागरिकांच्या माध्यमातून यांचा वृक्ष लागवड केली जाणार आहे. २५ हजार वृक्ष लागवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता असल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवता येत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर निविदा प्रक्रिया राबवल्यास उपयोग होणार नाही. (latest marathi news)

त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी वृक्ष लागवड करण्याच्या अनुषंगाने विविध प्रक्रिया राबविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. वृक्ष लागवड करताना पारंपारिक पद्धतीप्रमाणे रस्त्यांच्या दूतर्फा झाडे लावली जातात. मात्र रस्त्याचे रुंदीकरण करताना झाडे तोडावे लागतात. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला या वर्षापासून वृक्ष लागवड केली जाणार नाही. वृक्ष लागवड करताना मोकळे भूखंड तसेच उद्यानांच्या जागांवर लागवड केली जाणार आहे.

स्मृतीवन संकल्पनेला उजाळा

२०१६ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी स्मृतीवन संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळेल. मात्र गेडाम यांच्या बदलीनंतर स्मृतिवन संकल्पना बारगळली. आता पुन्हा नव्याने स्मृतिवन संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मृत झालेल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृतीपित्यर्थ वृक्ष लागवड करता येणार आहे. संबंधित व्यक्तीकडे वृक्ष संगोपनाची जबाबदारी दिली जाणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे अधिक्षक विवेक भदाणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सीजनबाबत प्रेक्षक झाले व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

'बिग बॉस मराठी ६'च्या धुमाळीत कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा; 'या' हिंदी मालिकेची आहे कॉपी; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलं

Kolhapur Election : मिसळ पे चर्चेत विकासाचा अजेंडा; महायुतीचा जाहीरनामा जीवनमान बदलणारा, मूलभूत सुविधा देऊन कोल्हापूर घडवणार – आमदार क्षीरसागर

SCROLL FOR NEXT