Ladki Bahin Yojana esakal
नाशिक

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण ‘रुसली’! अर्ज सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध नसल्याने केंद्रचालक अडचणीत

Nashik News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत कागदपत्र जमविण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली असताना नेमका अर्ज कुठे सादर करावा, याची ऑनलाइन लिंकच उपलब्ध झालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्य शासनाने घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत कागदपत्र जमविण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली असताना नेमका अर्ज कुठे सादर करावा, याची ऑनलाइन लिंकच उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अर्ज दाखल करावा कुठे, असा प्रश्‍न आपलं सरकार केंद्रचालकांसह समस्त महिलावर्गाला पडल्याने मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण सध्या रुसलेली आहे. (No online link made available where to submit application form under Chief Minister ladki bahin Yojana)

राज्य सरकारने महिलांना दीड हजार रुपये महिना देण्याची घोषणा केली. त्यासाठी पात्र महिलांना शहरातील आपलं सरकार केंद्र, तहसील, तलाठी कार्यालय, सेतू कार्यालयात अर्ज भरण्यासाठी आता झुंबड उडाली आहे. या योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी योजनेची लिंकच उपलब्ध न झाल्याने अर्ज दाखल करावा कुठे, असा प्रश्न आता केंद्रचालकांना पडला आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासन किंवा योजनेच्या समन्वयकांकडून कोणतेही निर्देश किंवा सूचना न देण्यात आल्याने या योजनेसाठी चार दिवसांत एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित्र पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलावर्गाची सेतू कार्यालयात एकच गर्दी दिसून येत आहे. १ जुलैपासून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

अनेक महिला या अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांसह आपलं सरकार केंद्र, सेतू केंद्रात गर्दी करू लागले आहेत; परंतु केंद्रचालकांनी लॉगिन केल्यानंतर योजनेची लिंकच उपलब्ध होत नसल्याने नेमका अर्ज कोणत्या पोर्टलवर भरावा याबाबत केंद्रचालक अनभिज्ञ दिसून येत आहेत. (latest marathi news)

त्यामुळे सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देण्यात येत आहे. मुळात योजनेच्या समन्वयकांनी यासंदर्भात बैठक घेऊन सूचना देणे आवश्यक होते. परंतु चार दिवस उलटूनही केंद्रचालकांना या योजनेबाबत कोणतेही मार्गदर्शन न मिळाल्याने योजनेच्या अंमलबजावणीबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे.

पन्नास टक्के प्रवासात माहेराला

महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्याचा फायदा यापूर्वीच अनेक महिलांनी घेतला. आता महिन्याला पंधराशे रुपये मिळणार म्हटल्यावर उत्पन्नाचा दाखला, जन्म किंवा शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी महिलांनी माहेरची वाट धरली आहे. जन्म व शाळा सोडल्याचा दाखला महिलांच्या माहेरी उपलब्ध असल्यामुळे लाडकी बहिण ‘माहेराला’ येत असल्याचे दिसून येते.

नारीशक्ती अ‍ॅपवर भरावा अर्ज

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अर्ज करावा. अर्ज ऑनलाइन ‘नारीशक्ती दूत’ अ‍ॅपवरदेखील उपलब्ध राहणार आहे. उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयातून उपलब्ध होणार असल्याने तहसीलसह तलाठी कार्यालय व सायबर केंद्रांना गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तलाठी कार्यालय, झेरॉक्स सेंटर, सायबर केंद्र यानंतर तहसील कार्यालय या सर्वच ठिकाणी गर्दी दिसून येत आहे.

"डोमिसाईल प्रमाणपत्र हे आपले सरकार केंद्र, सेतू सुविधा केंद्रात ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शासकीय शुल्कात मिळते. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विहित मुदतीत त्यांना प्रमाणपत्र मिळेल. उत्पन्नाचा दाखला देण्याबाबत तलाठींना सूचना देण्यात आलेल्या आहेत." - भीमराज दराडे, उपजिल्हाधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT