Nikhil Roongta Group Nashik  sakal
नाशिक

नाशिकमध्ये ‘अभी नहीं, तो कभी नहीं’

ललित रुंगटा ग्रुपचे संचालक निखिल यांचा विश्वास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सध्या सुरू असलेल्या व भविष्यातील पायाभूत प्रकल्पांचा विकास लक्षात घेता नाशिक शहरात आताच प्रॉपर्टी घेणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे ‘अभी नहीं, तो कभी नहीं’ अशी परिस्थिती नाशिक शहरात असल्याचा विश्वास प्रथितयश बांधकाम व्यावसायिक व ललित रुंगटा ग्रुपचे संचालक निखिल रुंगटा यांनी व्यक्त केला.

ललित रुंगटा ग्रुपतर्फे डिसेंबरअखेरपर्यंत प्रॉपर्टी फेस्ट होत आहे. प्रॉपर्टी फेस्टला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता निखिल यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना ‘रिअल इस्टेट क्षेत्रातील भविष्यातील नाशिक’ या विषयावर मत व्यक्त केले. ते म्हणाले, की सुवर्ण चतुष्कोनातील नाशिकची प्रगती नैसर्गिक पद्धतीने व वेगाने होत आहे. वाढत्या शहरात रस्त्यांचे जाळे विकसित होत आहे. ड्रेनेज होत आहेत. आता घरोघरी गॅसपुरवठा पाइपलाइन टाकली जात असल्याने प्रदूषणाची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाचा नाशिकमधून १२२ किलोमीटरचा प्रवास आहे. संपूर्ण सिमेंट-काँक्रिटचा रस्ता असल्याने नाशिक ते सुरत अंतर दोन तासांवर येणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्याबरोबरच तिसरे मेट्रो शहर नाशिकशी जोडले जाणार आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला मान्यता मिळाल्याने नाशिकसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.

समृद्धी महामार्गाला जोडणारे घोटी व वावी येथे दोन ॲप्रोच असल्याने व तेथे बिझनेस सेंटर प्रस्तावित आहे. आडगाव येथे सुरत ग्रीनफील्ड महामार्गावर बिझनेस सेंटर प्रस्तावित आहे. सिन्नर फाटा येथे रेल्वे, सिटी बस व मेट्रोसाठी मोडल हब प्रस्तावित आहे. महापालिकेने शहर बससेवा सुरू केल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. यांसारख्या पायाभूत सुविधांचा विचार करता नाशिक शहर वेगाने वाढत आहे. त्यामुळे घर किंवा व्यवसायासाठी गाळे खरेदीसाठी यासारखी संधी सध्या तरी दिसत नाही. नाशिकचे भौगोलिक स्थान गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांसाठी जवळचे आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई नाशिकजवळच आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्येही नाशिकचा समावेश आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी, नाशिक ते कल्याण लोकलची प्रस्तावित वाहतूक, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू या शहरांसाठी सुरू झालेली हवाई सेवा, शहरात सुरू होणारी मेट्रो आदी महत्त्वाच्या बाबी शहर विकासाला पूरक आहेत.

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया योजनेंतर्गत संरक्षण आणि हवाई क्षेत्रातील संशोधन आणि उत्पादन भारतातच व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हब स्थापन करण्याची घोषणा नुकतीच झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक उद्योग, स्टार्टअप, वैयक्तिक इनोव्हेट्‌स, संशोधन आणि विकासाचे काम नाशिकमध्ये सुरू होणार आहे. संरक्षणविषयक उत्पादनांशी संबंध नसलेल्या छोट्या उद्योगांनाही त्याचा फायदा होईल. आतापर्यंत संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग मुंबई आणि पुण्यातच होते. त्यात आता नाशिकही जोडले आहे. त्यामुळे इथे उद्योग आणि रोजगार सुरू होतील.

पर्यटनासाठी आदर्श ठिकाण

आरोग्यदायी नैसर्गिक वातावरण, थंड हवामान, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, इगतपुरी, वणी, सापुतारा, नांदूरमध्यमेश्वर अशी पर्यटनस्थळे, वाइन कॅपिटलमुळे नाशिक पर्यटनासाठी एक आदर्श ठिकाण आहे. धार्मिक तीर्थस्थळ आहे. आता लवकरच नाशिकच्या औद्योगिक विकासाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. नाशिक औद्योगिक विकास प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी अतिरिक्त जागा देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कृषी आधारित उद्योग वेगाने विकसित होत आहेत.

नाशिकची बलस्थाने

  • डिफेन्स इनोव्हेशन हब एअर कनेक्टिव्हिटी

  • रेल्वे टायर उत्पादन कारखाना रेल्वे कनेक्‍टिव्हिटी

  • देशाचे वाइन कॅपिटल धार्मिक पर्यटनाला संधी

  • नोटांचा कारखाना महामार्गांचे विस्तारीकरण-नाशिक-पुणे सेमी रेल्वेला मंजुरी मेट्रो निओ प्रकल्प समृद्धी महामार्ग व या महामार्गाला लागून प्रस्तावित बुलेट ट्रेन

  • सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

SCROLL FOR NEXT