NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik NMC : सव्वादोन लाख मालमत्ता थकबाकीदारांना नोटिसा! 483 कोटी वसुलीसाठी महापालिकेची कारवाई

Nashik News : ४८३ कोटी रुपये थकबाकी वसुलीसाठी महापालिकेच्या कर विभागाकडून सव्वा दोन लाख मिळकत धारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शंभर टक्के कर वसुली करण्यासाठी महापालिकेने लागू केलेली कर सवलत योजना संपुष्टात आल्याने ४८३ कोटी रुपये थकबाकी वसुलीसाठी महापालिकेच्या कर विभागाकडून सव्वा दोन लाख मिळकत धारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहे. थकबाकी अदा न करणाऱ्या मालमत्ताधारकांना मासिक दोन टक्के शास्ती आकारली जाणार असल्याचे मनपा कर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. (Notices to two and a half lakh property arrears)

मालमत्ता करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र मालमत्ता कराची वसुली किती प्रमाणात व कशी होते यावर सर्व महसूल प्राप्तीचे गणित अवलंबून असते. घरपट्टी किंवा मालमत्ता कर शंभर टक्के वसूल होण्यासाठी महापालिकेने २०१६ पासून त्रैमासिक कर सवलत योजना लागू केली आहे.

त्याअंतर्गत एप्रिल महिन्यात एक रक्कमी मालमत्ता कर अदा केल्यास आठ टक्के तर मे महिन्यात पाच टक्के व जून महिन्यात तीन टक्के सवलत आहे. त्याचबरोबर सौर उर्जेवर चालणाऱ्या साधनांचा वापर केल्यास एक टक्का सवलत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन कर अदा करणाऱ्यांना देखील तितकीच सवलत आहे.

जून महिन्यात कर सवलत योजना संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता मिळकत धारकांना मालमत्ता थकबाकी भरताना दरमहा दोन टक्के शास्ती लागू होणार आहे. त्यासाठी सव्वा दोन लाख थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या जाणार आहे. सव्वा दोन लाख मिळकतधारकांकडे ४८३ कोटी रुपये थकीत आहे. यामध्ये अडीचशे कोटी रुपये शास्तीची रक्कम आहे. (latest marathi news)

शंभर कोटी तिजोरीत जमा

कर सवलत योजनेमध्ये दोन लाख ३६ हजार ३९६ मिळकत धारकांनी शंभर कोटी २५ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहे. एप्रिल महिन्यात एक लाख ४७ हजार २४३ मिळकतधारकांनी ५७ कोटी ९५ लाख रुपये जमा केले.

तर मे महिन्यात ५९ हजार ३८२ मिळकतधारकांनी २६ कोटी ८९ लाख रुपये जमा केले. जून महिन्यात २९ हजार ७७१ मिळकत धारकांनी १५ कोटी ४१ लाख रुपये अदा केले. योजनेच्या माध्यमातून साडेचार कोटी रुपयांची सवलत मिळकत धारकांना मिळाली.

"मालमत्ताधारकांनी त्वरीत थकबाकी अदा करावी. अन्यथा नोटिसा बजावल्या जातील." - विवेक भदाणे, उपायुक्त, विविध कर विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT